Author: admin

कोल्हापूर दि. 12 (जिमाका) : आखाती प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना घरगुती एलपीजी गॅसचा सुरळीत, पारदर्शक व नियंत्रित पुरवठा होण्यासाठी व कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक/गॅस एजन्सी धारकांना पुढील सूचना देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त होम डिलिव्हरी पद्धतीनेच करावा. ग्राहकांना गोडाऊन अथवा एजन्सीवरून थेट सिलेंडर वितरण करू नये. तसेच सिंगल गॅस सिलिंडर कनेक्शन धारकांना प्राधान्य देण्यात यावे. गॅस सिलेंडरचे वितरण हे ऑनलाईन बुकींग झालेल्या ग्राहकांनाच करण्यात यावे तसेच नोंदणीकृत ग्राहकांनाच नियमानुसार पुरवठा करण्यात यावा, अनधिकृत ग्राहकांना किंवा नियमबाह्य पद्धतीने सिलेंडर वितरण करू नये. कोणत्याही ग्राहकास अनावश्यक साठा…

Read More

कोल्हापूर दि. 12 (जिमाका) : पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया अधिक कार्यक्षम व जलद करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले. या प्रशिक्षण सत्रामध्ये पासपोर्ट पडताळणीची प्रक्रिया, अलीकडील तांत्रिक सुधारणा आणि अचूक व वेळेत पोलीस पडताळणी अहवाल सादर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पासपोर्ट प्राधिकरण आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट सेवा अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच वेळेत आणि अचूक पोलीस पडताळणी ही पासपोर्ट वितरण प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून ती राष्ट्रीय…

Read More

कोल्हापूर दि. ११ नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणार्‍या विविध महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी केली. त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सकारात्मक प्रतिसाद देवून, या प्रकल्पांबद्दल सविस्तर माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक मोठ्या प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कागल ते सातारा सहा लेन कॉंक्रीट रस्त्यासाठी २ हजार १६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर कोल्हापूर ते रत्नागिरी चार लेन कॉंक्रीट रस्त्यासाठी ५ हजार १९२…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : वस्तू व सेवा कर कायदा, 2017 अंतर्गत नोंदणीकृत सर्व करदात्यांनी विहित मुदतीत जीएसटी विवरणपत्रे (GST Returns) सादर करणे व देय असलेली कर रक्कम वेळेत भरणे हे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. तथापि विभागाच्या निदर्शनास आले आहे की काही नोंदणीकृत करदात्यांनी अद्याप जीएसटी विवरणपत्रे सादर केलेली नाहीत तसेच काही करदात्यांकडे कर थकबाकी प्रलंबित आहे. यामुळे कर पालन प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, वस्तू व सेवा कर विभागामार्फत प्रलंबित विवरणपत्रे सादर करून घेणे व कर थकबाकी भरण्यासाठी विशेष पाठपुरावा मोहीम (Special Drive) हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रिटर्न न भरणाऱ्या व कर थकबाकीदार करदात्यांशी संपर्क साधण्यात…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : होलार समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादितची उप कंपनी) च्या फलकाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी संत रोहिदास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एम.पवार, समाज कल्याणचे अधिकारी अक्षय कुरणे व महात्मा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत,सतीश कांबळे, शितल भोरे,विश्वास करंबे व समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) योजनेअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना तसेच इतर नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व सरसेनापती प्रतापराव गुजर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 13 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. इलेक्ट्रीशियन, वेल्डर आणि पंप मॅकेनिक पदांकरीता 140 पेक्षा जास्त रिक्तपदे आहेत. यासाठी अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम ( STEP ) प्रशिक्षीत उमेदवार, 10 वी, 12 वी, आयटीआय पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.i‍n या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच अनुषंगिक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतर करून तेथील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. बाह्यरुग्ण विभागातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग (खोली क्र. २०३) हा विभाग त्वचा व गुप्त रोगशास्त्र विभागात (खोली क्र. ३०६) १३ मार्चपासून स्थलांतरित करण्यात येणार असून तेथूनच रुग्णसेवा सुरळीतपणे सुरू ठेवली जाणार आहे. तसेच त्वचा व गुप्त रोगशास्त्र विभागाचा बाह्यरुग्ण विभाग हा विभागप्रमुखांच्या कक्षात व शेजारच्या खोलीत सुरू ठेवण्यात येईल. सर्व…

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत एन.एस.टी.एफ.डी.सी. नवी दिल्ली मार्फत स्वयंरोजगाराच्या कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. शबरी शाखा कार्यालय, जुन्नर कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांकरिता कर्ज योजना राबविण्यासाठी सन 2025-26 साठी योजनानिहाय लक्षांक प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी www.mahashabari.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून 15 मार्चपर्यंत ऑनलाईन कर्ज फॉर्म भरावेत, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा (कार्यालय जुन्नर) येथील व्यवस्थापक रोहीत बनसोडे यांनी केले. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य तो कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडता यावा आणि त्यांचे प्रभावी पुनर्वसन व्हावे यासाठी तुळशी हॉल, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे 25 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत जिल्हास्तरावर समुपदेशन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील तज्ज्ञ समुपदेशक, अधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या शिबीरासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले. 0000

Read More

कोल्हापूर (प्रतिनिधी): केआयटी (KIT) कॉलेजमधील एका विभागप्रमुख प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, कॉलेजमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी ‘हिंदू एकता आंदोलन’तर्फे करण्यात आली आहे. आज, मंगळवारी दुपारी १२:३० वाजता हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दिपक सुरेशराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक (SP) योगेश कुमार यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले. यावेळी बोलताना दिपक देसाई म्हणाले की, “या प्रकरणात पीडित मुलींनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही ६ मार्च रोजी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मात्र, संबंधित प्राध्यापकाची वर्तणूक…

Read More