
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत एन.एस.टी.एफ.डी.सी. नवी दिल्ली मार्फत स्वयंरोजगाराच्या कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. शबरी शाखा कार्यालय, जुन्नर कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांकरिता कर्ज योजना राबविण्यासाठी सन 2025-26 साठी योजनानिहाय लक्षांक प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी www.mahashabari.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून 15 मार्चपर्यंत ऑनलाईन कर्ज फॉर्म भरावेत, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा (कार्यालय जुन्नर) येथील व्यवस्थापक रोहीत बनसोडे यांनी केले.
0000