
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य तो कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडता यावा आणि त्यांचे प्रभावी पुनर्वसन व्हावे यासाठी तुळशी हॉल, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे 25 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत जिल्हास्तरावर समुपदेशन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीरासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील तज्ज्ञ समुपदेशक, अधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या शिबीरासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले.
0000