Author: admin

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष सन 2026-27 साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती (वि.जा.भ.ज.), इतर मागास प्रवर्ग (इमाव) व विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील शालेय व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहांमध्ये विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सन 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून http://hmasnew.mahait.org या पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात आहेत. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शासकीय वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे अर्ज सादर करावा. इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार…

Read More

कोल्हापूर दि : 14 ( जिमाका ) प्रशासकीय कामकाजात गतिमानता यावी , नागरीकांची कामे भ्रष्टाचार विरहित व्हावीत या उद्देशाने शासनाने 67 सेवा ऑनलाइन कार्यरत केल्या आहेत . या सेवांबाबतीत मनपाने विहित वेळेत कार्यवाही करावी तसेच अर्ज प्रलंबित न ठेवता नागरिकांना दिलासा द्यावा असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग(सेवानिवृत्त – भाप्रसे) यांनी दिले . श्री तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर,उपायुक्त पारितोष कंकाळ,किरण कुमार धनवाडे,सहा.आयुक्त राम काटकर प्रामुख्याने उपस्थित होते . ऑनलाईन सेवांच्या अनुषंगाने कोल्हापूर…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व या महामंडळाअतंर्गत विविध इतर मागास प्रवार्गातील कार्यरत 13 उपकंपन्या शासनाने स्थापन केलेल्या असुन कोल्हापूर जिल्हास्तरावरील कामकाज कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या महामंडळ व उपकंपन्यामार्फत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना, बीजभांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना अशा एकूण 6 योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजना संपुर्णपणे ऑनलाईन स्वरुपाच्या असुन इतर मागास प्रवर्गातील पात्र अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : प्रधानमंत्री पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2026-27 अंतर्गत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत मृग व आंबिया बहारातील अधिसूचित फळपिकांना हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण मिळणार आहे. मात्र, बोगस कागदपत्रे किंवा चुकीची माहिती देऊन विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असून, संबंधित खातेदारांना पुढील पाच वर्षांसाठी पीक विमा योजनांमधून वगळण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी दिली आहे. मृग बहारामध्ये जिल्ह्यात पेरू या पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळांमध्ये योजना राबविण्यात येणार आहे. तर आंबिया बहारामध्ये आंबा, काजू, केळी व नारळ या फळपिकांसाठी विमा संरक्षण…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : श्री महालक्ष्मी/ अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या मंजूर जतन-संवर्धन आराखड्यांतर्गत वैज्ञानिक पद्धतीने कामे सुरू आहेत. या कामांमध्ये मंदिराच्या मूळ वास्तुशैलीचे जतन, पारंपरिक साहित्याचा वापर आणि पुरातत्त्वीय तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. मंदिरातील काही भागात झालेली पाणीगळती ही जतन-संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेचे अपयश नसून, नियोजित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण होण्यापूर्वी पावसाळा सुरू झाल्यामुळे निर्माण झालेली तात्पुरती परिस्थिती असल्याचे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कासव मंडपाच्या छताचे पाणीगळती प्रतिबंधक (वॉटरप्रूफिंग) काम पारंपरिक चुना-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या भागात कोणत्याही प्रकारची पाणीगळती आढळून आलेली नाही. महासरस्वती व महाकाली मंदिरांच्या छतावरील वॉटरप्रूफिंगच्या कामाच्या…

Read More

कोल्हापूर/आजरा, दि. १३ (जिमाका): आजरा तालुक्यातील जंगली हत्तींचा वावर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान हा अनेक वर्षांपासूनचा चिंतेचा विषय आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आजरा तालुक्यात लवकरच ‘हत्ती संगोपन केंद्र’ (हत्ती कॅम्प) उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे जलसंधारण विभागाच्या तलावात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बोटिंग प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. घाटकरवाडी आणि परिसरातील गावांमध्ये जंगली हत्तींकडून शेतीचे सातत्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर प्रश्नाबाबत निवेदन दिले. जोपर्यंत हत्ती संगोपन केंद्र…

Read More

कोल्हापूर, दि. १३ (जिमाका) : पाय चिखलात… हातात भाताची रोपे आणि सोबत शेतकरी व अधिकारी… पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वतः शेतात उतरून चिखलणी केली आणि चारसूत्री पद्धतीने भाताची रोपे लावली. निमित्त होते जिल्हा प्रशासनाच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचे. दिवसभर शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत त्यांनी शेतीतील प्रयोग पाहिले, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि सेंद्रिय शेतीपासून आधुनिक एआय तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयांवर त्यांच्याशी थेट संवाद साधला. सन २०२६-२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळा तालुक्यातील केखले आणि बांदिवडे या गावांची निवड केली. केवळ कार्यालयीन स्तरावर शेतीविषयक माहिती घेण्याऐवजी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकऱ्यांचे अनुभव, अडचणी आणि…

Read More

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 5.30 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. दुपारी 4 वा.च्या पाणी पातळी अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील- रुई, इचलकरंजी व शिरोळ, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व बाचणी असे एकूण 5 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील सद्य स्थितीतील पाणीसाठा पुढीलप्रमाणे :- राधानगरी 5.30, तुळशी 1.99, वारणा 20.81, दूधगंगा 8.11,कासारी 1.56,कडवी 1.45, कुंभी 1.40,पाटगाव 1.79, चिकोत्रा 0.61,चित्री 1.10, जंगमहट्टी 0.84, घटप्रभा 1.45 ,जांबरे 0.80,आंबेआहोळ 0.93, सर्फनाला 0.59 तर धामणी येथे 1.29 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे :- राजाराम 13.5 फूट, सुर्वे 16.6, रुई 42.10, इचलकरंजी 39.9, तेरवाड…

Read More

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : खरीप हंगाम 2026-27 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी केले. खरीप हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या अधिसूचित पिकांसाठी ही योजना लागू आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. खातेदार शेतकऱ्यांबरोबरच कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेत सहभागी होण्यासाठी महत्त्वाच्या अटी- शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य आहे. पीक…

Read More

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 18 जुलै रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 12 उद्योजकांकडून 538 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांकरीता किमान 8 ते 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा, बी.टेक तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच स्वयंरोजगार करू इच्छ‍िणाऱ्या उमेदवारांकरीता व‍िव‍िध प्रकारची महामंडळे उदा. अण्णासाहेब पाटील…

Read More