
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष सन 2026-27 साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती (वि.जा.भ.ज.), इतर मागास प्रवर्ग (इमाव) व विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील शालेय व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहांमध्ये विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सन 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून http://hmasnew.mahait.org या पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात आहेत. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शासकीय वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे अर्ज सादर करावा. इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.