
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 5.30 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. दुपारी 4 वा.च्या पाणी पातळी अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे.
पंचगंगा नदीवरील- रुई, इचलकरंजी व शिरोळ, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व बाचणी असे एकूण 5 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमधील सद्य स्थितीतील पाणीसाठा पुढीलप्रमाणे :- राधानगरी 5.30, तुळशी 1.99, वारणा 20.81, दूधगंगा 8.11,कासारी 1.56,कडवी 1.45, कुंभी 1.40,पाटगाव 1.79, चिकोत्रा 0.61,चित्री 1.10, जंगमहट्टी 0.84, घटप्रभा 1.45 ,जांबरे 0.80,आंबेआहोळ 0.93, सर्फनाला 0.59 तर धामणी येथे 1.29 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे :- राजाराम 13.5 फूट, सुर्वे 16.6, रुई 42.10, इचलकरंजी 39.9, तेरवाड 38.9, शिरोळ 31.9, नृसिंहवाडी 24 तर नजीकच्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे 7 फूट इतकी पाणीपातळी आहे.
00000