
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व या महामंडळाअतंर्गत विविध इतर मागास प्रवार्गातील कार्यरत 13 उपकंपन्या शासनाने स्थापन केलेल्या असुन कोल्हापूर जिल्हास्तरावरील कामकाज कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या महामंडळ व उपकंपन्यामार्फत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना, बीजभांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना अशा एकूण 6 योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजना संपुर्णपणे ऑनलाईन स्वरुपाच्या असुन इतर मागास प्रवर्गातील पात्र अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कावळा नाका (ताराराणी चौकाजवळ), कोल्हापूर, दुरध्वनी क्रमांक 0231-2653512 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
0000