Author: admin

कोल्हापूर दिनांक 02 – जुना बुधवार पेठेतील जाणारा धोकादायक हायवे,अलिकडे झालेले अपघात, वाढलेली वाहतूक व्यवस्था,नवीन होणाऱ्या उड्डाणं पूल, स्थानिक नागरिक शाळेतील मुले यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत येत नाही यावर सविस्तर निर्णय घेण्यासाठी जुना बुधवार पेठेतील स्थानिक रहिवाश्यांनी मिटिंगचे आयोजन केले होते. या वेळी मिटिंग चे अध्यक्ष माजी महापौर महादेवराव आडगुळे साहेब यांच्या अध्यक्षते खाली मिटिंग पार पडली.यावेळी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जुना बुधवार पेठेच्या मुख्य रस्ता हा रत्नागिरी हायवे ला जोडणारा असल्याने या मार्गावर दररोज हजारो वाहनांची ये जा होत असते.त्यात अवजड वाहनांचा सुद्धा जास्त समावेश असल्याने येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले असून…

Read More

कोल्हापूर दिनांक 1 -सांगरूळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील काँग्रेस उमेदवारांसाठी आमदार जयंत आसगावकर यांच्यासह सांगरूळ येथे प्रचारसभा घेतली. सांगरूळ परिसर हा नेहमीच काँग्रेसच्या विचारांचा राहिला आहे. स्वर्गीय बोंद्रे दादा, पी. एन. पाटील साहेब, स्वर्गीय मारुती खाडे साहेब यांच्यासारख्या निष्ठावान नेत्यांनी काँग्रेसचा विचार जिवंत ठेवला. काँग्रेसचा हाच विचार पुढे नेण्यासाठी माझी लढाई सुरू आहे. त्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी. पी. एन. साहेबांच्या माघारी विकासकामांसाठी सांगरूळ दत्तक घेणार असून गावाला निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास ग्रामदैवत जोतिबाच्या साक्षीने व्यक्त केला. यावेळी गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य. ल. खाडे, तसेच शिवाजीराव खाडे, प्रशांत नाळे, पन्हाळा…

Read More

कोल्हापूर दिनांक 27 – जुना बुधवार पेठ येथील राजेंद्र दत्ताजीराव मोहिते पाटील याने दोन बहिणी जिवंत असताना ती माहिती लपवून खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे शासनाची फसवणूक करून 2384 डी वॉर्ड जुना बुधवार पेठ येथील वडिलोपार्जित मालमत्ता नावावर केल्याने राजेंद्र मोहिते पाटील व अन्य दोन साक्षीदारांवर फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. राजेंद्र दत्ताजीराव मोहिते पाटील याला जयश्री आणि मृणाल या दोन बहिणी असताना वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित मालमत्ता नावावर करताना त्याने तो स्वतः व त्याचा भाऊ महेंद्र हे दोघेच वारस असून अन्य कोणीही वारस नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर केले होते.याबाबत कोर्टाने लक्ष्मीपुरी पोलिसांकडून कलम 202 अन्वये अहवाल मागविला होता.पोलिसांनी त्यामध्ये…

Read More

कोल्हापूर दिनांक 31 – आज पहाटे ऊस भरून चाललेला ट्रॅक्टर भर चौकात पलटी झाला.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पाण्याची पाईप लाईन फुटून पाणी बेसमेंट मध्ये घुसलेने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.त्यामुळे जुना बुधवार पेठेतील मुख्य मार्गावर वारंवार अपघात होऊ लागल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे. जुना बुधवार पेठेतून साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर तसेच इतर अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे.आधीच दाटीवाटीचे रस्ते त्यात ग्रामीण भागातून येणारी वाहने यामुळे आधीच या भागातील नागरिक त्रस्त आहेत.त्यातच काही दिवसांपूर्वी ट्रक खाली सापडून मृत्यू झाला आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.त्यामुळे…

Read More

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २८ डिसेंबर, २०२५ रोजी इयत्ता ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही अंतिम उत्तरसूची परिषदेकडील https://www.mscepune.in/ तसेच https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेच्या MAT व SAT विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास ऑनलाईन निवेदन सादर करण्याबाबत 9 जानेवारी रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार 16 जानेवारी पर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन ही अंतिम उत्तरसूची तयार करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही पुढील निवेदन/आक्षेप स्वीकारले…

Read More

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): राज्यातील सर्व जिल्हा परिषदमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025 परीक्षेचे 3 व 4 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पध्दतीने प्रत्येक दिवशी तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने 29 जानेवारी रोजी www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षार्थी उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळास भेट द्यावी. प्रवेशपत्र डाऊन करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी 1800 222 366/1800 103 4566 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा व https://cgrs.ibps.in/ या लिंकवर तक्रार नोंदवावी. प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्यासाठी आवश्यक लॉगिन आयडी (Registration No.) आवेदनपत्रावर…

Read More

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव 2025 चे आयोजन शनिवार व रविवार, 14 व 15 फेब्रुवारी रोजी श्री इंजुबाईदेवी सांस्कृतिक भवन, गारगोटी (सोनाळी), ता. भुदरगड येथे करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच ग्रंथालयांशी संबंधित सॉफ्टवेअर कंपन्यांचे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. ग्रंथ प्रदर्शन/विक्री स्टॉलसाठी इच्छुकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, 2078, आकाशगंगा अपार्टमेंट समोर, राजारामपुरी 11 वी गल्ली, कोल्हापूर येथे लेखी पत्रासह दि.…

Read More

कोल्हापूर, दि. २७* : सर्वसामान्यांची होणारी फसवणूक, आरोग्याशी चाललेला खेळ आणि कायद्याचे उल्लंघन करून जे कोणी चुकीच्या पद्धतीने उपचार करत असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. प्रत्येक गावोगावी आणि शहरांमध्ये विशेष मोहीम राबवून अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी. जिल्ह्यातून बोगस डॉक्टर ही संकल्पनाच हद्दपार करून गावे ‘बोगस डॉक्टरमुक्त’ असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बोगस डॉक्टर विरोधी समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक तहसील कार्यालय,…

Read More

कोल्हापूर, दि. २७ (जिमाका): अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत, जातीच्या दाखल्याअभावी ६ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांची दखल घेत, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अशा प्रकरणांमध्ये संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशी (प्रांताधिकारी) समन्वय साधून तातडीने जातीचा दाखला देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे सूचित केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘जिल्हा दक्षता व सनियंत्रण समिती’च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार आणि समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, पोलिसांकडे जी १५ प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित…

Read More

कोल्हापूर दिनांक 24 – पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेस वेतवडे पंचायत समिती मतदार संघासाठी स्वर्गीय आमदार पी. एन.पाटील साहेब यांचा आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या पाठबळावर सर्वसामान्य रुग्णांना अडचणीच्या समयी आधारवड ठरणाऱ्या आणि कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात आधार देणाऱ्या बाजीराव कांबळे यांच्या सौभाग्यवती सौ. शितल कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरल्या असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे सौ. शितल कांबळे यांनी सांगितले. येथील मतदार संघातील मतदार बंधू भगिनींशी जिव्हाळ्याचे संबंध ग्रामीण भागातून जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ते कोणत्याही वेळी निस्वार्थी भावनेने मदत करतात. अडचणीच्या वेळी रुग्णांच्या वेदनेवर मारलेली हळुवार फुंकर हीच माझी पुण्याई आहे.स्वर्गीय आमदार…

Read More