कोल्हापूर दिनांक 24 – पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेस वेतवडे पंचायत समिती मतदार संघासाठी स्वर्गीय आमदार पी. एन.पाटील साहेब
यांचा आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या पाठबळावर सर्वसामान्य रुग्णांना अडचणीच्या समयी आधारवड ठरणाऱ्या आणि कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात आधार देणाऱ्या बाजीराव कांबळे यांच्या सौभाग्यवती सौ. शितल कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरल्या असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार
असल्याचे सौ. शितल कांबळे यांनी सांगितले. येथील मतदार संघातील मतदार बंधू भगिनींशी जिव्हाळ्याचे संबंध
ग्रामीण भागातून जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ते कोणत्याही वेळी निस्वार्थी भावनेने मदत करतात. अडचणीच्या वेळी रुग्णांच्या वेदनेवर मारलेली हळुवार फुंकर हीच माझी पुण्याई आहे.स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांचे आशीर्वाद, राहुल पाटील आणि राजेश पाटील
यांची साथ आणि पती बाजीरावकांबळे यांची मतदाराशी असणारा
थेट संवाद याच ताकदीवर मी निवडणूक लढवणार असल्याचे
सौ.शितल कांबळे यांनी भन्नाट न्यूजशी बोलताना सांगितले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
