Author: admin

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTI) देशातील रस्ते अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘राह-वीर’ (पूर्वीची गुड समेरिटन योजना) योजनेची घोषणा केली आहे. अपघातातील गंभीर जखमींना पहिल्या महत्त्वाच्या तासात (गोल्डन अवर) तातडीने मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र ‘राह-वीर’ व्यक्तीला 25 हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. एकाच गंभीर अपघातात एकापेक्षा अधिक नागरिकांनी मिळून एखाद्याचा जीव वाचविल्यास 25 हजार रुपयांची रक्कम संबंधित मदतगारांमध्ये समान विभागली जाईल. एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त पाच वेळा या पारितोषिकाचा लाभ घेता येईल. वर्षभरात…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल, ता. भुदरगड येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 34 खासगी उद्योजकांकडून 3 हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच स्वयंरोजगार करू इच्छ‍िणाऱ्या उमेदवारांकरीता व‍िव‍िध प्रकारची महामंडळे उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा…

Read More

कोल्हापूर, दि.१४ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावपातळीपासून विविध आरोग्य संस्था तसेच जिल्हास्तरापर्यंत कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील विविध आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी स्वातंत्र्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचा थेट ऑनलाइन जनसंवाद कार्यक्रम दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथून या ऑनलाइन सभेचे व उद्घाटनचे नियोजन करण्यात आले आहे. या जनसंवादाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती (VHNSC), जन आरोग्य समिती (JAS), रुग्ण कल्याण समिती (RKS) तसेच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती यांच्या अशासकीय सदस्यांशी मंत्री महोदय थेट संवाद साधणार आहेत. आरोग्य विभागाच्या विविध योजनांची…

Read More

कोल्हापूर 14 (जिमाका) : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्यालयात पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वा. या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नयेत. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्या पूर्वी किंवा सकाळी 9.35 वा. च्या नंतर आयोजित करावा. कोल्हापूर जिल्हा मुख्यालयात मुख्य शासकीय…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 3 खुला असून सध्या धरणातून स्वयंचलित दरवाज्यामधून 1428 व पावर हाऊसमधून 1400 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे व हळदी, दूधगंगा नदीवरील- सुळकूड असे एकूण 12 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.27 (99 टक्के), तुळशी 3.40 (98 टक्के), वारणा 31.29 (91 टक्के), दूधगंगा 22.90 (90 टक्के), कासारी 2.45 (88 टक्के),…

Read More

कोल्हापूर दि : 13 (जिमाका) मानवी समाजामध्ये सफाई कर्मचारी अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. त्यांच्याबाबतीतील म्हणजेच आर्थिक,सामाजिक तसेच सेवाविषयक प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पहावे आणि त्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत त्याचबरोबर या सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग डागोर यांनी आज दिले. कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या श्री डागोर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली.या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन,समाजकल्याण सहा. आयुक्त सचिन साळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांच्या…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या तिस-या सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय कागल येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी तक्रारी लेखी स्वरुपात दोन प्रतीत सादर कराव्यात, असे आवाहन कागलचे तहसिलदार अमरदिप वाकडे यांनी केले आहे. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन चारचाकी नोंदणी मालिका MH५१L चे 12 ऑगस्ट रोजीपासुन कामकाज सुरु करण्यात येत असून MH५१L पसंती क्रमांकाचे अर्ज 12 ते 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 ते 3 या वेळेत कार्यालयात स्विकारण्यात येतील. MH५१L ही नवीन चार चाकी मालीका MH५१F ही मालिका सुरु असताना आगाऊ सुरु करण्यात आलेली आहे त्यामुळे MH५१L या मालीकेतील नंबरसाठी तीनपट शुल्क आकारण्यात येईल. वाहन नोंदणी क्रमांकांची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावयाचे आहे- पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ…

Read More

कोल्हापूर, दि.11 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने एकूण रु. 750 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या तरतुदीपैकी यापूर्वी 20 मे रोजी 150 कोटी रुपयांचा निधी महामंडळास प्राप्त झाला होता. या निधीतून पात्र लाभार्थ्यांच्या व्याज परताव्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे. त्यानंतर व्याज परताव्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी महामंडळाने 8 जुलै रोजी शासनाकडे रु. 400 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. महामंडळाच्या मागणीची दखल घेऊन शासनाने 3 ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित करून रु. 300 कोटींचा निधी मंजूर केला. त्यानुसार हा 300 कोटींचा निधी 8 ऑगस्ट रोजी…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): भारत सरकारच्या हर घर तिरंगा 2026 अभियानाच्या अनुषंगाने नागरिक, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांनी राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहितेतील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत खालील बाबी सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत. हर घर तिरंगा 2026 अभियानाचा कालावधी 9 ते 17 ऑगस्ट असा आहे. या कालावधीत नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांना अभियानाच्या कालावधीतील कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकविता येईल. तथापि, राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, सन्मान व पावित्र्य अबाधित राहील, याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने जुलै 2022 मध्ये भारतीय ध्वज संहितेत केलेल्या सुधारणेनुसार, खुल्या जागेत…

Read More