
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या तिस-या सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय कागल येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी तक्रारी लेखी स्वरुपात दोन प्रतीत सादर कराव्यात, असे आवाहन कागलचे तहसिलदार अमरदिप वाकडे यांनी केले आहे.
0000