Author: admin

कोल्हापूर दि. 13 (जिमाका): एअर वेटरंन्स संचालनालय (डीव्हीए), एअर मुख्यालय, संरक्षण कर्मचारी मुख्यालय (संरक्षण मंत्रालय) यांनी महाराष्ट्राच्या एकत्रित निधीच्या राज्य व्यवस्थापन समितीवर गैर-सरकारी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी, इच्छुक हवाई दल अधिकाऱ्यांकडून नामांकने मागविली आहेत. जिल्ह्यातील इच्छुक निवृत्त हवाई दल अधिकारी यांनी आपले नामांकन, इच्छुक प्रमाणपत्र व बायोडाटा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे 16 जानेवारीपर्यंत जमा करावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकाकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मधील कलम 135 (ब) तरतुदीच्या आदेशानुसार सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स मध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल…

Read More

कोल्हापूर दि.12 ( विमाका ) शीख धर्माचे नववे धर्मगुरू श्री. गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक व सर्व सामान्य नागरिकांचा या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने इयत्ता 8 ते 12 वी या वर्गातील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या गटात निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी प्राण दिले .धर्मांतर सक्तीला शरण न जाता त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. त्यांच्या शौर्याचे,बलिदानाचे व देशाबद्दलचे मानवतावादी कार्य लक्षात घेऊन तसेच त्यांच्या पराक्रमाची व्यापक…

Read More

मुंबई — ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून, त्यांच्या सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिल्या. नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर…

Read More

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी–2026) च्या 9 व्या मोहिमेअंतर्गत इयत्ता 6 वी ते 12 वीचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्वरुपातील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 1 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत https://innovateindial.mygov.in/from या संकेतस्थळावर राबविण्यात येत आहे. या स्पर्धेद्वारे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालकांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या सहभागी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना परीक्षा पे चर्चा मोहिमेमध्ये मा. पंतप्रधान यांच्यासोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या ऑनलाईन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन…

Read More

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पुणे विभाग, पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता अनुक्रमे 18 व 19 नमुन्यात अर्ज सादर करावयाचे होते. या कार्यक्रमातंर्गत दिनांक 6 नोव्हेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या ऑफलाईन व ऑनलाईन अर्जावर अंतिम निर्णय घेऊन 3 डिसेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. प्रसिध्द केलेल्या यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी 3 ते 18 डिसेंबर हा कालावधी देण्यात होता. त्यानुसार प्राप्त झालेल्या 12 हरकतीवर योग्य निर्णय घेऊन हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. 7 नोव्हेंबर…

Read More

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग मार्फत थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधींची नेमणूक (कमिशन तत्वावर) करण्यात येणार आहे. अटींची पूर्तता करणा-या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो व अन्य संबधित दस्तावेज सोबत जोडुन प्रवर अधीक्षक डाकघर, रमणमळा, कोल्हापूर येथे 20 जानेवारी पूर्वी प्रत्यक्ष अथवा टपालाद्वारे जमा करावेत, असे आवाहन कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी केले आहे. पात्रतेच्या अटी- वय मर्यादा : उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पुर्ण असावे कमाल वयाची कोणतीही अट नाही. शैक्षणिक पात्रता : उमेदवार…

Read More

कोल्हापूर दि : 9 (जिमाका) जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील समाज कल्याण विभागातंर्गत येणाऱ्या चार अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या पन्हाळा तालुक्यातील मसूद माले,शिरोळ,राधानगरी आणि गगनबावडा येथील शाळेमधील विद्यार्थ्यांची इस्त्रोच्या या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत,होतकरू आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांचा यामध्ये प्राधान्याने समावेश आहे. निवड झालेले हे विद्यार्थी बेंगळुरू व हैदराबाद येथील इस्रो संस्थेतील उपग्रह निर्मिती,प्रक्षेपण प्रक्रिया,अंतराळ संशोधन त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती हे विद्यार्थी घेणार असल्याने विज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणा त्यांना या दौऱ्यामुळे…

Read More

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : विलास विनायक मोहोळकर, प्लॉट नं 702, मोहिते पॅराडाईज, मॅकडॉनल्ड शेजारी, आनंदनगर, सिंहगड रोड पुणे यांच्याकडून 1 लाख रुपये इतकी रक्कम वसुल करण्यासाठी मौजे कसबा करवीर जि. कोल्हापूर येथील ई वॉर्ड नगर भूमापन क्रमांक 514/1/क/अ तसेच समीर उत्तमराव काळे, डायरेक्टर भारतीय कामगार कर्मचारी महासंघ वि.के.ए. के फाँड्री प्रा.लि. यांच्याकडून एकूण रक्कम रु. 9 लाख 85 हजार 480 इतकी रक्कम वसुल करण्यासाठी मौजे कसबा बावडा येथील नगर भूमापन क्रमांक 1/अ/16/17/अ ही स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. संबंधितांनी आवश्यक ती रक्कम भरली नाही तर सदरची मालमत्ता तहसिलदार कार्यालय करवीर, कोल्हापूर येथे 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता…

Read More

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात 9 जानेवारीच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 21 जानेवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. हा हुकूम सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्ये, अधिकार बजावण्यासंदर्भात आणि कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात तसेच एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने…

Read More