
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी–2026) च्या 9 व्या मोहिमेअंतर्गत इयत्ता 6 वी ते 12 वीचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्वरुपातील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 1 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत https://innovateindial.mygov.in/from या संकेतस्थळावर राबविण्यात येत आहे.
या स्पर्धेद्वारे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालकांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या सहभागी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना परीक्षा पे चर्चा मोहिमेमध्ये मा. पंतप्रधान यांच्यासोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या ऑनलाईन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2950866 वर संपर्क साधावा.
0000