
कोल्हापूर दि. 13 (जिमाका): एअर वेटरंन्स संचालनालय (डीव्हीए), एअर मुख्यालय, संरक्षण कर्मचारी मुख्यालय (संरक्षण मंत्रालय) यांनी महाराष्ट्राच्या एकत्रित निधीच्या राज्य व्यवस्थापन समितीवर गैर-सरकारी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी, इच्छुक हवाई दल अधिकाऱ्यांकडून नामांकने मागविली आहेत. जिल्ह्यातील इच्छुक निवृत्त हवाई दल अधिकारी यांनी आपले नामांकन, इच्छुक प्रमाणपत्र व बायोडाटा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे 16 जानेवारीपर्यंत जमा करावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
0000