
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : विलास विनायक मोहोळकर, प्लॉट नं 702, मोहिते पॅराडाईज, मॅकडॉनल्ड शेजारी, आनंदनगर, सिंहगड रोड पुणे यांच्याकडून 1 लाख रुपये इतकी रक्कम वसुल करण्यासाठी मौजे कसबा करवीर जि. कोल्हापूर येथील ई वॉर्ड नगर भूमापन क्रमांक 514/1/क/अ तसेच समीर उत्तमराव काळे, डायरेक्टर भारतीय कामगार कर्मचारी महासंघ वि.के.ए. के फाँड्री प्रा.लि. यांच्याकडून एकूण रक्कम रु. 9 लाख 85 हजार 480 इतकी रक्कम वसुल करण्यासाठी मौजे कसबा बावडा येथील नगर भूमापन क्रमांक 1/अ/16/17/अ ही स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. संबंधितांनी आवश्यक ती रक्कम भरली नाही तर सदरची मालमत्ता तहसिलदार कार्यालय करवीर, कोल्हापूर येथे 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजता जाहीर लिलावाने विकली जाणार आहे, अशी माहिती करवीर तहसिलदार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
लिलावाच्या शर्ती पुढील प्रमाणे – नमूद केलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन 1 कोटी, 88 लाख, 35 हजार 348 इतके असून यापेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही. लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने 1/4 रक्कम तात्काळ भरावयाची आहे. लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलाव धारकांना समज दिल्यापासून तीन दिवसात उर्वरित 3/4 रक्कम जमा करावयाची आहे. 3/4 रक्कम जमा न केल्यास फेरलिलाव केला जाईल व त्यात बोली कमी आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या 1/4 रकमेतून वजा केली जाईल.थकबाकीदाराने लिलाव पुकारल्यानंतर 30 दिवसाच्या आत संपूर्ण थकबाकी,नोटीस फी, लिलाव पुकारल्याचा खर्च इत्यादी खर्च जमा करुन लिलाव रद्द करण्यास सक्षम अधिकाऱ्याकडे विनंती केल्यास लिलाव ज्याच्या नावे मंजूरी अंतरावर पूर्ण केला आहे त्यास बोली रक्कमेच्या 5 टक्के रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल. सक्षम अधिका-याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल. त्या आधारे लिलावधारकास मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल, अशी माहिती करवीर तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
00000