Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. ०४ : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा ४० वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार – २०२६’ ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जागर करणारे विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोपरांत प्रदान करण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. या पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, डॉ.अशोक चौसाळकर, सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत…
कोल्हापूर, दि. ६ : केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFFS) या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे ५ जून रोजी, कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ३१९ खत बुकिंगसाठी क्यूआर कोड निर्माण करण्यात आले. त्यानंतर आज प्रत्यक्ष खत वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. करवीर तालुक्यातील कोगे येथील मोरे ॲग्रो सर्व्हिसेस अँड प्रॉडक्ट्स येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांच्या हस्ते क्यूआर कोड स्कॅन करून…
कोल्हापूर, दि.०८: सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून महिला व बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, छेडछाड, सायबर बुलिंग आणि पोक्सो संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी, राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात तीन हजार शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी, पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणे ही आजच्या काळाची मोठी गरज असल्याचे प्रतिपादन केले. समाजमाध्यमांच्या गैरवापरामुळे निर्माण होणारी आव्हाने आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेता, समाजातील सर्व घटकांना जागरूक करण्यासाठी या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यात या…
कोल्हापूर, दि. ८ (जिमाका): संभाव्य पूरस्थितीच्यावेळी विस्थापित कराव्या लागणाऱ्या जनावरांकरिता तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये दाखल होणा-या जनावरांना चारा, पशुखाद्य व मुबलक पाणी पुरविण्यासाठी सेवाभावी संस्था, उत्पादक, पुरवठादार यांचेकडून चारा/मुरघाससाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. अटी व शर्ती:- सन २०१९ व २०२१ मध्ये खालीलप्रमाणे गावे पुरामुळे पूर्णतः बाधित झाली होती. करवीर तालुका : आरे, प्रयाग चिखली, आंबेवाडी शिरोळ तालुका : शिरटी, कुरुंदवाड, बस्तवाड, आलास, बुबनाळ, राजापुर, राजापुरवाडी, खिद्रापूर, नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, हसुर, कनवाड, कुद्वाड, अर्जुनवाड, घालवाड, जुने दानवाड, नवे दानवाड व कवठेसार हातकणंगले तालुका : निलेवाडी, चावरे, जुने पारगाव, इंगळी व व चंदूर छावणीत दाखल होणाऱ्या मोठ्या व लहान जनावरांना पिण्यासाठी…
कोल्हापूर, दि. ०४ : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा ४० वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार – २०२६’ ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जागर करणारे विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोपरांत प्रदान करण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. या पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, डॉ.अशोक चौसाळकर, सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत…
कोल्हापूर, दि. 04 (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार, 5 जून रोजी सकाळी 10.10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता राखीव. दुपारी 3 वाजता भारत सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुर्यघर योजना व विशेष सखोल पुनरिक्षण गणना संदर्भात मार्गदर्शन व बैठकीस उपस्थिती; दुपारी 4 वाजता बीएलए-2 संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ : मटकरी हॉल, कागल) सोयीनुसार निवासस्थानाकडे प्रयाण. शनिवार, 6 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता गडहिंग्लज येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व पक्ष कार्यालयात नागरिकांच्या गाठीभेटी. दुपारी…
कोल्हापूर, दि. 04 (जिमाका) : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार, 8 जून रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विधानभवन येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा सदस्य सचिव शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यात समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो. 0000
कोल्हापूर, दि. 03 : राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या माथा रस्त्यावरील वेअरिंग कोट दुरुस्तीच्या कामाबाबत 5 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात पाटबंधारे विभागाने खुलासा केला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील चार वर्षांत कसबा वाळवे बंधाऱ्यावरील माथा रस्त्याच्या वेअरिंग कोटची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. कसबा वाळवे आणि चंद्रे या दोन गावांदरम्यान दूधगंगा नदीवर अन्य कोणताही पूल उपलब्ध नसल्याने या बंधाऱ्यावरील रस्त्याचा दोन्ही गावांतील नागरिक दैनंदिन ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करतात. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी माथा रस्त्याच्या वेअरिंग कोट दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच कामानंतर आवश्यक असलेली ‘क्युरिंग प्रक्रिया योग्य प्रकारे…
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 4 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 16 जून च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व…
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका): पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील नमूद भागात रब्बी हंगाम 2026-27 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 कलम 51 (3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये उपसाबंदी जाहीर केली आहे. भोगावती नदी कार्यवाहीचा भाग- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग व कासारी नदीवरील यवलूज को.प. बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर को.प. बंधाऱ्यापंर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ को.प. बंधाऱ्याच्या खालील बांजू कुंभी व भोगावती नदीपर्यंतच्या संगमांपर्यंत दोन्हा तीरावर वर नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या…