
कोल्हापूर, दि. 04 (जिमाका) : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार, 8 जून रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विधानभवन येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा सदस्य सचिव शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यात समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो.
0000