
कोल्हापूर, दि. 04 (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शुक्रवार, 5 जून रोजी सकाळी 10.10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता राखीव. दुपारी 3 वाजता भारत सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुर्यघर योजना व विशेष सखोल पुनरिक्षण गणना संदर्भात मार्गदर्शन व बैठकीस उपस्थिती; दुपारी 4 वाजता बीएलए-2 संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ : मटकरी हॉल, कागल) सोयीनुसार निवासस्थानाकडे प्रयाण.
शनिवार, 6 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता गडहिंग्लज येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व पक्ष कार्यालयात नागरिकांच्या गाठीभेटी. दुपारी 1 ते 6 वाजता राखीव. सायं. 6 वाजता गलगले, ता. कागल येथील नुतन ग्रामपंचायत इमारत व विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार निवासस्थानाकडे प्रयाण.
रविवार, 7 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता रावसाहेब ताराबाई श्रीपती देसाई, उत्तूर, ता. आजरा यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: ज्योतिरादित्य हॉल, उत्तूर) दुपारी 12 ते 4 वाजता विविध बैठक/ कार्यक्रमांसाठी राखीव. दुपारी 4 वाजता दैनिक लोकमतच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ: रेसिडेन्सी क्लब) सोयीनुसार निवासस्थानाकडे प्रयाण.
सोमवार, 8 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठ येथे बांधण्यात आलेल्या शरण साहित्य अध्यासन केंद्र या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 1 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयासंदर्भात आढावा बैठक. रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000