
कोल्हापूर, दि. ८ (जिमाका): संभाव्य पूरस्थितीच्यावेळी विस्थापित कराव्या लागणाऱ्या जनावरांकरिता तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये दाखल होणा-या जनावरांना चारा, पशुखाद्य व मुबलक पाणी पुरविण्यासाठी सेवाभावी संस्था, उत्पादक, पुरवठादार यांचेकडून चारा/मुरघाससाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
अटी व शर्ती:- सन २०१९ व २०२१ मध्ये खालीलप्रमाणे गावे पुरामुळे पूर्णतः बाधित झाली होती.
करवीर तालुका : आरे, प्रयाग चिखली, आंबेवाडी
शिरोळ तालुका : शिरटी, कुरुंदवाड, बस्तवाड, आलास, बुबनाळ, राजापुर, राजापुरवाडी, खिद्रापूर, नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, हसुर, कनवाड, कुद्वाड, अर्जुनवाड, घालवाड, जुने दानवाड, नवे दानवाड व कवठेसार
हातकणंगले तालुका : निलेवाडी, चावरे, जुने पारगाव, इंगळी व व चंदूर
छावणीत दाखल होणाऱ्या मोठ्या व लहान जनावरांना पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.
हिरवा चारा (मका, ऊस, उसाचे वाढे)- मोठी जनावरे १८ किलोग्रॅम व लहान जनावरे – ९ किलोग्रॅम
पशुखाद्य (आठवड्यातून ३ दिवस १ दिवसाआड)- मोठी जनावरे १ किलोग्रॅम व लहान जनावरे – ०.५ किलोग्रॅम
किंवा वाळलेला चारा (कडबा किंवा कडब्याची कुट्टी, वाळलेला चारा किंवा वाळलेले गवत)- मोठी जनावरे ६ किलोग्रॅम व लहान जनावरे -३ किलोग्रॅम
पशुखाद्य (आठवड्यातून ३ दिवस १ दिवसाआड) – मोठी जनावरे 1 किलोग्रॅम व लहान जनावरे -०.५ किलोग्रॅम
किंवा मक्याचा मुरघास- मोठी जनावरे ८ किलो व लहान जनावरे – ४ किलो
अटी व शर्ती :
दरपत्रके सादर करताना तालुकानिहाय चाऱ्याचा प्रकारानुसार प्रति टन दर व वाहतुकीसह जागा पोहोच पुरवठा करण्याचा दर स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात यावा. चाऱ्याची भरणी व उतरणी करण्याचा खर्च पुरवठादार यांनी करावयाचा आहे. चारा पुरवठा करताना भरलेल्या गाडीचे वजन काटा पावती व मोकळ्या झालेल्या गाडीचे वजन काटा पावती सादर करणे बंधनकारक राहील.जी गाडी चारा वाहतुकीसाठी वापरलेली आहे त्या गाडीची कागदपत्रे (वाहन नोंदणी पत्र) सादर करणे बंधनकारक राहील.
नमूद चारा निशुल्क दराने पुरावठादार / सेवा भावी संस्था/ गोरक्षणासाठी कार्यरत संस्था तयार असल्यास त्यांनी सुद्धा आपली नावे व आपण पुरवठा करू इच्छिता अशा गावांची नावे कळवावीत. अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शासन निर्णयानुसार मक्याच्या मुरघासाची किंमत रुपये ६.५० पैसे/किलो ग्राम एवढी निश्चित करण्यात आलेली आहे याची नोंद घेण्यात यावी. नमूद क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी १२ जून पर्यंत शासकीय वेळेत बंद लिफाफ्यामध्ये चाऱ्याच्या प्रकारानुसार तालुकानिहाय वाहतुकीसह जागा पोहोच प्रति टन याप्रमाणे दरपत्रके जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र आवार, ताराबाई पार्क, कोल्हापूर ०३ या कार्यालयास टपालाने अथवा समक्ष सादर करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
0000