Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. १३ जून २०२६: पोदार प्रेप कोल्हापूर येथे बहुप्रतीक्षित “योग इन मड” या उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, कुटुंबीय आणि शिक्षक मोठ्या आनंदाने सहभागी झाले. मजा, शिक्षण आणि निसर्गाशी नाते जोडणारा हा अनुभव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला. आंतरराष्ट्रीय मड डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये योग आणि संवेदनात्मक (Sensory) खेळ यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. पालक आणि मुलांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अनुभवाधारित शिक्षणाचा आनंद घेतला.या कार्यक्रमात मडी बडीज योग, मडी फीट योग, मातीने माखलेल्या हातांनी मुद्रा, मड पेंटिंग मास्टरपीस, मड बेकरी आणि मुक्त माती खेळ अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे…
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या अधिनस्त जिल्ह्यातील विविध मुलांचे व मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुलांचे शासकीय वसतिगृह पाचगाव, दसरा चौक, गडहिंग्लज, गारगोटी, हातकणंगले, कागल, चंदगड, शिरोळ, आजरा व राधानगरी येथे कार्यरत आहेत. तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह साईनाथ कॉलनी, कसबा बावडा, गारगोटी, हातकणंगले, गडहिंग्लज, आजरा व इचलकरंजी येथे सुरू आहेत. या वसतिगृहांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. शालेय विद्यार्थी तसेच इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या…
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या निमित्ताने नागरिकांमध्ये योगाचा प्रसार आणि व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि हॅबिल्ड हेल्थटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने एका ऐतिहासिक ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाइन योगासने करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस आहे. या जागतिक विक्रमाचा भाग बनण्याची सुवर्णसंधी सर्व नागरिकांना उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे : दिनांक : 14 जून सकाळी 6.15 ते 7.15 वाजता आयुष मंत्रालयाचे अधिकृत युट्युब चॅनेल (ऑनलाइन) सहभागाची प्रक्रिया : या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 1800-315-7008 या टोल-फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल…
कोल्हापूर, दि. 12 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी अंतर्गत नवीन दुचाकी MH51K नोंदणी मालिका 15 जून पासून सुरु करण्यात येत आहे. MH51K पसंती क्रमांकाचे अर्ज 15 जून रोजी सकाळी 9.45 ते 5 या वेळेत कार्यालयात स्विकारण्यात येतील. MH51K ही नवीन दुचाकी मालिका MH५१J मालिका सुरु असताना आगाऊ सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे MH51K या मालिकेतील नंबरसाठी तीनपट शुल्क आकारण्यात येईल. वाहन नोंदणी क्रमांकांची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावयाचे आहे.- पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेच्या तीनपट रकमेचा डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष)…
कोल्हापूर, दि. 12 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अर्जदारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जातीमधील महार, नवबौद्ध, वाल्मिकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम व बेडाजंगम या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी http://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन. एस. सावंत यांनी केले आहे. अनुदान योजना : या योजनेअंतर्गत भौतिक उद्दिष्ट 35 असून आर्थिक उद्दिष्ट रुपये 8.75 लाख आहे. ही योजना रुपये 50,000 पर्यंत असून त्यामध्ये रुपये 25,000 अनुदान स्वरूपात व रुपये 25,000 पर्यंत…
कोल्हापूर, दि. 12 : हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीमधील हिंदु खाटीक प्रवर्गातील अर्जदारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन 2026-27 या आर्थिक वर्षातील उद्दिष्टपूर्तीसाठी पात्र लाभार्थ्यांनी http://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन. एस. सावंत यांनी केले आहे. महामंडळामार्फत अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना तसेच एनएसएफडीसीच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. अनुदान योजना : या योजनेअंतर्गत 5 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून आर्थिक तरतूद 1.25 लाख रुपये आहे. योजना 50 हजार रुपयांपर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रुपये अनुदान आणि 25 हजार रुपयांपर्यंत बँक कर्जाचा लाभ…
जून महिना उजाडला की नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागते. घराघरांत मुलांच्या शाळा प्रवेशाची लगबग सुरू होते. आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, हा प्रत्येक पालकासमोरील महत्त्वाचा प्रश्न असतो. अशा वेळी एक मराठी माणूस, एक जबाबदार पालक आणि आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणारा नागरिक म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे – “आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश का देऊ नये?” आज आपल्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम शिक्षक, आधुनिक सुविधा आणि संस्कारक्षम वातावरण यामुळे नव्या उंचीवर पोहोचत आहेत. याला आणखी उंचीवर पोहोचविण्यासाठी आवश्यक आहे तो पालकांचा विश्वास ! आणि पालक म्हणून आपला सक्रिय सहभाग ! केवळ…
कोल्हापूर, दि. १२ (जिमाका): जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावणारे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र वीर जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले. या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर आज गोंडोली येथील वारणा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात आणि साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद विक्रम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर गोंडोली येथे झाले होते, तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोकरूड येथील यशवंत महाविद्यालयातून पूर्ण केले होते. देशसेवेची आवड असल्याने त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि अहिल्यानगर येथे आपले लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१८ मध्ये राजस्थानमधील…
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आजअखेर राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी…
कोल्हापूर, दि. ११ : जिल्ह्यात कोणत्याही व्यवसायात १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवू नये, तसेच शासनाच्या ३० जुलै २०१६ च्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित उद्योग व प्रक्रिया करणाऱ्या संस्थांमध्ये १४ वर्षांखालील बालक तसेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या आस्थापनेमध्ये बालकास कामावर ठेवल्यास संबंधितांवर ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा २० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. तसेच प्रतिबंधित उद्योग व प्रक्रिया करणाऱ्या संस्थांमध्ये किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवल्यासही अशीच कारवाई होऊ शकते. ज्या आस्थापनांमध्ये बालकामगार आढळून येतील, त्या आस्थापनांचा परवाना अथवा नोंदणी रद्द केली जाऊ शकते तसेच…