
कोल्हापूर, दि. 12 : हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीमधील हिंदु खाटीक प्रवर्गातील अर्जदारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन 2026-27 या आर्थिक वर्षातील उद्दिष्टपूर्तीसाठी पात्र लाभार्थ्यांनी http://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन. एस. सावंत यांनी केले आहे.
महामंडळामार्फत अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना तसेच एनएसएफडीसीच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत.
अनुदान योजना : या योजनेअंतर्गत 5 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून आर्थिक तरतूद 1.25 लाख रुपये आहे. योजना 50 हजार रुपयांपर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रुपये अनुदान आणि 25 हजार रुपयांपर्यंत बँक कर्जाचा लाभ दिला जातो.
बीजभांडवल योजना : या योजनेसाठी 5 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून 2.50 लाख रुपये अनुदान आणि 2.25 लाख रुपये बीजभांडवलाची तरतूद आहे. 50 हजार 1 रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी बँकेचा सहभाग 75 टक्के, लाभार्थ्यांचा सहभाग 5 टक्के आणि महामंडळाचे बीजभांडवल 20 टक्के राहणार असून त्यामध्ये 50 हजार रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे.
थेट कर्ज योजना : या योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून आर्थिक तरतूद अनुदानासाठी 3 लाख रुपये आणि बीजभांडवलासाठी 2.70 लाख रुपये आहे. ही योजना 1 लाख रुपयांपर्यंत मर्यादित असून त्यामध्ये महामंडळाचे 45 हजार रुपयांचे कर्ज, 50 हजार रुपयांचे अनुदान आणि लाभार्थ्यांचा 5 हजार रुपयांचा सहभाग अपेक्षित आहे.
एनएसएफडीसी मुदत कर्ज योजना (TL) : या योजनेत 4 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून 2 लाख रुपये अनुदान व 8.80 लाख रुपये मुदत कर्जाची तरतूद आहे.
एनएसएफडीसी सूक्ष्मपत पुरवठा योजना : या योजनेत 2 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून 1 लाख रुपये अनुदान आणि 1.80 लाख रुपये मुदत कर्ज उपलब्ध आहे.
एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजना : या योजनेत 2 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून 1 लाख रुपये अनुदान व 35 लाख रुपयांपर्यंत मुदत कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, बाबर हॉस्पिटल शेजारी, जिल्हा कार्यालय, कोल्हापूर-416003 येथे अथवा दूरध्वनी क्रमांक 0231-2663853 वर संपर्क साधावा.
0000