
कोल्हापूर, दि. 12 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अर्जदारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जातीमधील महार, नवबौद्ध, वाल्मिकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम व बेडाजंगम या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी http://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन. एस. सावंत यांनी केले आहे.
अनुदान योजना : या योजनेअंतर्गत भौतिक उद्दिष्ट 35 असून आर्थिक उद्दिष्ट रुपये 8.75 लाख आहे. ही योजना रुपये 50,000 पर्यंत असून त्यामध्ये रुपये 25,000 अनुदान स्वरूपात व रुपये 25,000 पर्यंत बँक कर्ज लाभार्थ्यांना दिले जाते.
बीजभांडवल योजना : या योजनेचे भौतिक उद्दिष्ट 35 असून आर्थिक उद्दिष्टामध्ये अनुदान रुपये 17.50 लाख व बीजभांडवल रुपये 131.25 लाख आहे. ही योजना रुपये 50,001 ते रुपये 5,00,000 पर्यंत असून त्यामध्ये बँकेचा हिस्सा 75 टक्के, लाभार्थ्याचा सहभाग 5 टक्के व महामंडळाचे बीजभांडवल 20 टक्के आहे. या योजनेमध्ये रुपये 50,000 अनुदानाचा समावेश आहे.
थेट कर्ज योजना (रु. 1 लाख) : या योजनेचे भौतिक उद्दिष्ट 70 असून आर्थिक उद्दिष्टामध्ये अनुदान रुपये 35 लाख व बीजभांडवल रुपये 31.50 लाख आहे. ही योजना रुपये 1 लाख मर्यादित असून त्यामध्ये महामंडळाचे कर्ज रुपये 45,000, अनुदान रुपये 50,000 तसेच अर्जदाराचा सहभाग रुपये 5,000 असा आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, बाबर हॉस्पिटल शेजारी, जिल्हा कार्यालय, कोल्हापूर – 416003 येथे संपर्क साधावा. तसेच दूरध्वनी क्रमांक 0231-2663853 वरही संपर्क करता येईल.
0000