Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
पुरवठा अधिकारी पदाचा लक्ष्मण माने यांच्यावर अतिरिक्त भार.निरीक्षकांना करावे लागत आहे क्लार्कचे काम. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज. कोल्हापूर दिनांक 18 – कोल्हापूर शहर अन्न पुरवठा विभागावर संपूर्ण कोल्हापूर शहराच्या जवळपास 6 लाख लोकसंख्येचा भार असून तो केवळ 3 ते 4 कर्मचारी वर्गावर आल्याने पुरवठा विभागावर ताण आला आहे.पुरवठा निरीक्षक, गोदाम निरीक्षक यांना सुद्धा क्लार्कचे काम करावे लागत असल्याने जादा कर्मचारी देण्याची गरज निर्माण झाली असून जिल्हाधिकारी यांनी याबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे. कोल्हापूर शहरात 5 ते 6 लाख लोकसंख्या असून जवळपास 75000 पेक्षा जास्त शिधापत्रिका शहर पुरवठा विभागांतर्गत कार्यरत आहेत.या शिधापत्रिकांचे नाव कमी करणे,नाव वाढवणे,शिधापत्रिका विभक्त,अन्न धान्य लागू करणे…
कोल्हापूर दिनांक 16 – कोल्हापूर महानगर पालिके अंतर्गत येणाऱ्या रविवार पेठेतील शेलाजी वन्नाजी शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक संजय जयसिंग नार्वेकर वय – 52 वर्षे रा.सांगाव रोड,दत्त कॉलनी,कागल जिल्हा. कोल्हापूर याला रु 3000 ची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.शाळा सोडल्याचे दाखले देण्यासाठी पैशाची मागणी केल्याने तक्रारदाराने तक्रार देऊन कारवाई केली. तक्रारदार यांनी जातीचा दाखला काढण्यासाठी त्यांचे वडिलांचा व पाच चुलते असे एकूण सहा शाळा सोडल्याचे दाखले मिळणे करिता महानगरपालिकेच्या शेलाजी वन्नाजी विद्यालय शाळा क्रमांक 24 येथे गेले असता शाळेचा मुख्याध्यापक संजय नार्वेकर याने रु 500 प्रमाणे एकूण सहा दाखल्यांचे 3000 रु लाचेची मागणी केली.त्यानुसार लाचेची मागणी…
कोल्हापूर येथे राजाराम महाविद्यालय हे महाराष्ट्र शासनाचे महाविद्यालय असून महाविद्यालय शंभर वर्षाहून जुने व अनेक विद्वान लोकांना घडवलेले महाविद्यालय आहे पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये महाविद्यालयाचा स्तर खूप ढासळत आहे ते पुढील प्रमाणे… १) तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांना मार्च महिन्यामध्ये पूर्ण 31 तारखेपर्यंत काम करण्यास लावण्यात आले व नंतर 23 मार्च पर्यंतचे बील देणार असे सांगण्यात आले. याचबरोबर मागील तीन महिन्यापासून तासिका तत्वावरील शिक्षकांचा पगार देखील देण्यात आलेला नाही, यामुळे तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे आर्थिक स्थिती बेताची झालेली आहे. २) राजाराम महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी कार्यरत असणारे काही शिक्षक चार ते पाच महिन्यातून एकदाच तास घेतात बाकी सर्व काम सीएसबी कडून करून घेतात. वास्तविक…
*जल व्यवस्थापनाच्या जनजागृती उपक्रमात सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग घ्यावा* *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* मुंबई दि. 15 :- जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा’ शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झाले. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यातील कार्यक्रमांमध्ये प्रत्येक पालकमंत्री महोदयांनी सक्रिय सहभागी घेऊन कामे करून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. जलसंपदा विभागाच्या वतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन मंत्रालयातील मंत्रीमंडळ सभागृहात झाला. त्यावेळी जलसंपदा (…
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसिलदार विजय पवार, नायब तहसिलदार दिगंबर सानप, आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते पूजन, मंत्री शंभुराज देसाई यांची उपस्थिती गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात लाखो भाविकांची जोतिबा डोंगरावर उपस्थिती कोल्हापूर, दि.12 : जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत यासाठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री जोतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साकडे घातले. राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्यसंपन्न , सुखी व आनंदी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यांच्या हस्ते चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा देवाच्या भेटीसाठी आलेल्या भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती. गुलालाने नाहून निघालेल्या…
कोल्हापूर, दि. 11 :- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई येथे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांचे आभार मानले. या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे – कोल्हापूर सह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर…
रविवारी “जुना बुधवार विरुद्ध खंडोबा” हाय व्होल्टेज सामना.संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष.जुना बुधवार डार्क हॉर्स ठरण्याची शक्यता कोल्हापूर दिनांक 11 – कोल्हापुरात सध्या सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात संयुक्त जुना बुधवार ने बालगोपाल ला टाय ब्रेकर वर नमवत चषकाच्या अंतिम सामन्यासाठी प्रवेश केला आहे.त्यामुळे सुमारे 25 वर्षानंतर जुना बुधवार टीम च्या स्थापने नंतर चषक जिंकण्याची संधी जुना बुधवार ला आलेली आहे.त्यामुळे तमाम फुटबॉल प्रेमींची उत्सुकता शिगेला पोचली आहे. यापूर्वीच्या उप उपांत्य सामन्यात बलाढ्य पी टी एम ला नमवून जुना बुधवार ने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता.त्यानंतर आज जुना बुधवार आणि बालगोपाल यांच्यात उपांत्य सामना आज पार पडला. दोन्ही…
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रम व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर व धर्मादाय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील वृध्दाश्रम, मतिमंद मुलांची शाळा, मूकबधीर मुलांची शाळा, दिव्यांग मुलांची शाळा अशा १६ ठिकाणी धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी हा आरोग्य शिबीराचा नाविण्यपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास धर्मादाय सह आयुक्त श्रीमती निवेदिता पवार, धर्मादाय उप आयुक्त शरद वाळके, सहायक धर्मादाय आयुक्त-१ आयुर्वेदाचार्य चंद्रमुखी गरड, प्रमुख उपस्थिती कांचनगंगा सुपाते- जाधव, डॉ. रामेश्वरी, न्यासाचे पदाधिकारी तसेच वृध्दाश्रमातील सर्व लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, प्रमुख उपस्थिती कांचनगंगा सुपाते- मातोश्री वृध्दाश्रम…