कोल्हापूर येथे राजाराम महाविद्यालय हे महाराष्ट्र शासनाचे महाविद्यालय असून महाविद्यालय शंभर वर्षाहून जुने व अनेक विद्वान लोकांना घडवलेले महाविद्यालय आहे पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये महाविद्यालयाचा स्तर खूप ढासळत आहे ते पुढील प्रमाणे…
१) तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांना मार्च महिन्यामध्ये पूर्ण 31 तारखेपर्यंत काम करण्यास लावण्यात आले व नंतर 23 मार्च पर्यंतचे बील देणार असे सांगण्यात आले. याचबरोबर मागील तीन महिन्यापासून तासिका तत्वावरील शिक्षकांचा पगार देखील देण्यात आलेला नाही, यामुळे तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे आर्थिक स्थिती बेताची झालेली आहे.
२) राजाराम महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी कार्यरत असणारे काही शिक्षक चार ते पाच महिन्यातून एकदाच तास घेतात बाकी सर्व काम सीएसबी कडून करून घेतात. वास्तविक पाहता राजाराम महाविद्यालयांमधील कला शाखेचे महाविद्यालय सकाळी आठ वाजता सुरू होते तरी देखील कायमस्वरूपी चे जे प्राध्यापक आहेत ते सकाळी 11 नंतर येतात. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी त्यांचे रोजचे बायोमेट्रिक चेक करू शकता.वास्तविक पाहता कला शाखेची मुलं ही सकाळी आठ ते बारा या वेळेतच महाविद्यालयात असतात तरी देखील हे कायमस्वरूपी प्राध्यापक त्यांचा तास न घेता त्यांच्या हाताखालील सीएचबी शिक्षकांकडून सर्व कामे करून घेतात.
३) महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक सकाळी महाविद्यालयात येतात बायोमेट्रिक हजरी लावतात व आपली चार चाकी गाडी घेऊन महाविद्यालयातून बाहेर जातात ते सायंकाळी पुन्हा हजेरी लावण्यासाठी येतात . याची शहानिशा करण्यासाठी आपण महाविद्यालयाच्या गेटवरील सीसीटीव्हीची पाहणी करू शकता.
४) प्राध्यापिका अर्चना पाटील या गणित विषयाच्या प्राध्यापिका आहेत त्यांची सुरुवातीची नेमणूक ही हंगामी स्वरूपाची होती.या नेमणुकी मध्ये देखील आपण पाहिले असता आपणास यांच्या सर्विस मध्ये खंड दिसून येईल, याचबरोबर हंगामी शिक्षकांना मातृत्वाची रजा नसते. त्याऐवजी तिथे दुसरा शिक्षक घेणे बंधनकारक असते,पण संबंधित प्राध्यापिका महाविद्यालयात हजर नसताना देखील त्यांना महाविद्यालयांमध्ये दाखवून कोर्टामार्फत त्यांना कायमस्वरूपी प्राध्यापक करण्यात आले. आपण जर अर्चना पाटील यांची पूर्ण सर्विस फाईल बघितली की आपणास सर्व प्रकार लक्षात येईल. पण महाविद्यालयातील( एका प्राध्यापक गटाच्या ) त्या सदस्य असल्यामुळे व आर्थिक ताकतीच्या जोरावर त्यांना कायमस्वरूपी प्राध्यापक करण्यात आले आहे या बद्दल त्यांची चौकशी करण्याचे याआधी देखील आम्ही निवेदन दिले आहे.
५) राजाराम महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांच्या गेल्या अनेक वर्षात बदल्या झालेल्या नाहीत. एक प्राध्यापक तर गेले पंधराहून अधिक वर्ष येथे कार्यरत आहे. व ज्या प्राध्यापकांच्या बदल्या होतात ते एका महिन्याच्या आत आपल्या बदल्या रद्द करून आणतात, यामुळे कॉलेजमध्ये प्राध्यापकांची गटबाजी सुरू आहे व या सगळ्यातून महाविद्यालयाची बदनामी होत असते. काही प्राध्यापक तर सरळ सांगतात बदली झाली तर वरती पैसे देऊन पंधरा दिवसात बदली कॅन्सल करून आणतो..
७) होम सायन्स च्या म्हणजेच (पदार्थ विज्ञान) च्या आजी -माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी नुसार या विभागातील कायमस्वरूपी व तासिका तत्त्वावरील दोन्ही शिक्षकांना या विषयाबद्दल काहीच माहिती नाही व त्या दोन्ही प्राध्यापकांना हे विषय शिकवता सुद्धा येत नाहीत. होम सायन्स मधील (१) अन्न विज्ञान आणि पोषण (२) कापड आणि फॅशन डिझाइन(3) गृह व्यवस्थापन (४) बाल विकास (५) विस्तार या बद्दल या प्राध्यापिकेस काही सुद्धा येत नाही. यामुळे बीए भाग तीनला होम सायन्स घेताना विद्यार्थी गोंधळात पडतात. अशावेळी आपला कोटा पूर्ण करण्यासाठी या प्राध्यापिकेकडून विद्यार्थ्यांना “तुम्ही लेक्चरला न येता फक्त परीक्षेला या “मी तुम्हाला प्रॅक्टिकल चे मार्क चांगले देतो, तर काही विद्यार्थ्यांना तुमची महाविद्यालयाची फी ‘ मी ‘भरतो फक्त पेपरला या असे सांगण्यात येते. असे महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी तक्रारीमध्ये सांगितले आहे यामुळे कायमस्वरूपी या प्राध्यापक आहेत त्या पूर्ण शैक्षणिक वर्षात एखादा – दुसरा च तास घेतात नाहीतर त्यांचे तास होत नाहीत. सकाळी हजेरी लावली की संबंधित प्राध्यापक जातात ते सायंकाळी येतात.
८) नॅक ने A++ शेरा दिलेल्या महाविद्यालयामध्ये पावसाळ्यामध्ये अनेक वर्गात गळतीमुळे पाणी येते तर काही वर्गांमध्ये लाईट व फॅन नाही. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहांची स्थिती दयनिय आहे. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नाही.
९) काही प्राध्यापकांना महाविद्यालय ची ही जी स्थिती आहे ती बघवली जात नाही, हे महाविद्यालय पहिल्यासारखं चांगल्याने सुरू व्हावं अशी अनेक प्राध्यापकांची इच्छा आहे. पण महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणारे काही प्राध्यापकांचे टोळके या प्राध्यापकांना जाणून-बुजून त्रास देते. याआधी देखील काही प्राध्यापकांनी महाविद्यालयाचे प्राध्यापक हॅरेश मेंट करतात अशा तक्रारी पोलीस स्टेशनला सुद्धा केल्या आहेत. एकदा तर एक तोतया माणूस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचा स्वीय सहाय्यक आहे,म्हणून उभा करण्यात आला व संबंधित व्यक्ती मंत्री महोदयांच्या आदेशाने महाविद्यालयाची पाहणी काढण्यासाठी आलेत. असे सांगण्यात आले व काही प्राध्यापकांना या तोतया माणसाच्या माध्यमातून मानसिक त्रास सुद्धा देण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यात या महाविद्यालयात घडला आहे.
१०) महाविद्यालयाबाबत जेव्हा जेव्हा आम्हाला तक्रारी मिळतात त्या घेऊन आम्ही प्राचार्यांकडे जातो तेव्हा प्राचार्य म्हणून आपल्या कडून समाधान कारक उत्तर कधीच आले नाही,तसेच आमच्या संघटनेचे पदाधिकारी महाविद्यालय कॅम्पस मध्ये पुन्हा आल्यास पोलिसात गुन्हा नोंद करेन,अशी उत्तरे आपल्या कडून केली जातात. यामुळे या महाविद्यालयाचा कारभार सुस्तीत आणण्यासाठी लवकरात लवकर एखादा चांगला प्रशासक नेमावा जेणेकरून राजाराम महाविद्यालयाचा नावलौकिक चांगला होईल व हे जुने महाविद्यालय आपले गत वैभव पुन्हा प्राप्त करेल. त्याचबरोबर या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये तात्काळ बदल्या कराव्यात जेणेकरून महाविद्यालयात प्राध्यापकांची जी गटबाजी सुरू आहे,काही प्राध्यापक आपण या महाविद्यालयाचे मालक आहोत असे वर्तन करत आहेत.यांना चाप बसेल. आपण वरील प्रकरणांमध्ये लक्ष घालून महाविद्यालयात चालू असणारा अनागोंदी कारभार थांबवावा अन्यथा युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकशाही मार्गाने आंदोलन करेल अश्या मागणीचे निवेदन आज कोल्हापूर युवासेनेच्या वतीने राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती बोडके यांच्या कडे देण्यात आले..या दरम्यान प्राचार्या यांनी पदाधिकारी यांना आत येण्यास मनाई केल्यानंतर बराच वेळ तनाव निर्माण झाला होता, त्यांनतर पोलीसांच्या मध्यस्ती नंतर पदाधिकारी यांना आत घेण्यात आले..
यावेळी उपस्थित
युवासेना जिल्हा प्रमुख मंजित किरण माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, महानगर प्रमुख सनराज शिंदे,शहर प्रमुख सुमित मेळवंकी,समन्व्यक रोहित वेढे,किर्ती जाधव, सचिन नांगटिळक,ओंकार मंडलिक,शुभम पाटील,अक्षय घाटगे,अभि दाबाडे,युवराज मोरे,प्रथमेश देशिंगे,सिद्धेश नाईक,आदित्य हुलजी,विशाल दाबाडे, मारुती कारंडे,आकाश शिंदे,विशाल दाबाडे आदी
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
