पुरवठा अधिकारी पदाचा लक्ष्मण माने यांच्यावर अतिरिक्त भार.निरीक्षकांना करावे लागत आहे क्लार्कचे काम. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज.
कोल्हापूर दिनांक 18 – कोल्हापूर शहर अन्न पुरवठा विभागावर संपूर्ण कोल्हापूर शहराच्या जवळपास 6 लाख लोकसंख्येचा भार असून तो केवळ 3 ते 4 कर्मचारी वर्गावर आल्याने पुरवठा विभागावर ताण आला आहे.पुरवठा निरीक्षक, गोदाम निरीक्षक यांना सुद्धा क्लार्कचे काम करावे लागत असल्याने जादा कर्मचारी देण्याची गरज निर्माण झाली असून जिल्हाधिकारी यांनी याबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे.
कोल्हापूर शहरात 5 ते 6 लाख लोकसंख्या असून जवळपास 75000 पेक्षा जास्त शिधापत्रिका शहर पुरवठा विभागांतर्गत कार्यरत आहेत.या शिधापत्रिकांचे नाव कमी करणे,नाव वाढवणे,शिधापत्रिका विभक्त,अन्न धान्य लागू करणे ही कामे तर करावीच लागतात शिवाय संपूर्ण कोल्हापूर शहराच्या नागरिकांना नवीन रेशन कार्ड सारखी सेवा सुद्धा द्यावी लागते.त्यातच सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांच्याकडे सदरचा भार अतिरिक असून त्यांच्यावरसुद्धा दोन्ही कडील कामाचा ताण आहे.तसेच सध्या दोन महिला पुरवठा निरीक्षक असून त्यांना सुद्धा क्लार्कचे काम करावे लागत आहे.तसेच प्रमोशन झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आहे तेच काम करावे लागत आहे.
त्यामुळे सदर पुरवठा विभागाला पुरेशा कर्मचारी वर्गाची गरज निर्माण झाली असून जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून पुरवठा विभागाला जादा कर्मचारी वर्ग द्यावा अशी मागणी होताना दिसत आहे.
