कोल्हापूर दिनांक 16 – कोल्हापूर महानगर पालिके अंतर्गत येणाऱ्या रविवार पेठेतील शेलाजी वन्नाजी शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक संजय जयसिंग नार्वेकर वय – 52 वर्षे रा.सांगाव रोड,दत्त कॉलनी,कागल जिल्हा. कोल्हापूर याला रु 3000 ची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.शाळा सोडल्याचे दाखले देण्यासाठी पैशाची मागणी केल्याने तक्रारदाराने तक्रार देऊन कारवाई केली.
तक्रारदार यांनी जातीचा दाखला काढण्यासाठी त्यांचे वडिलांचा व पाच चुलते असे एकूण सहा शाळा सोडल्याचे दाखले मिळणे करिता महानगरपालिकेच्या शेलाजी वन्नाजी विद्यालय शाळा क्रमांक 24 येथे गेले असता शाळेचा मुख्याध्यापक संजय नार्वेकर याने रु 500 प्रमाणे एकूण सहा दाखल्यांचे 3000 रु लाचेची मागणी केली.त्यानुसार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत विभागाने सापळा रचून संजय नार्वेकर याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.त्यानुसार संजय नार्वेकर याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे मुख्याध्यापकाने अशा पद्धतीने शाळा सोडल्याचे दाखले देण्यासाठी पैसे मागितल्याने सदर कारवाई मुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली असून ज्ञानदानाचे धडे दिल्या जाणाऱ्या ठिकाणी लाचेची घटना घडणे निंदनीय असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
