कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसिलदार विजय पवार, नायब तहसिलदार दिगंबर सानप, आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
