Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलच्या परिसरातील पडसर जमीनीतील गवताची सन 2025 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीरांनी प्रत्यक्ष पहाणी करुन आपली दरपत्रके सिलबंद लिफाफ्यासह दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावीत, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ले. कर्नल. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे. प्राप्त सिलबंद लिफाफ्यातील जास्तीत जास्त रक्कम असणा-या दरपत्रकास मान्यता देण्यात येईल. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0231-2665812 किंवा व्हाट्स अँप क्र. 9172035612 वर संपर्क साधावा.
पन्हाळा ता. ३० सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम चालू असल्याने पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी होत आहे.आज शुक्रवार असला तरीही पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी होती यातील एका महिला पर्यटकाची पर्स येथील निसार नगारजी या गाईड युवकाला सापडली होती ती त्याने त्यातील सुमारे आडीच लाखाचा ऐवजासह पोलिसांचे समोर परत करत प्रामाणिकपणा दाखवला. पन्हाळगड नेहमीच पर्यटकांचे आकर्षण बनलेला आहे. त्यामुळे येथे तिन्हीही ऋतुत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. त्यातच मे महिना म्हणजे उन्हाळी सुट्टीचा जणू हंगामच. मग केवळ शनिवारी रविवारच्या सुट्टीचीच वाट कोण बघणार.त्यामुळे शुक्रवार असूनही पन्हाळगड पर्यटकांनी गजबला होता.यात युवकांच्या बरोबरच मोठ्या संख्येने काटुंबासमवेत येणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षानीय होती. अश्याच एक कुटूंब तबक उद्यान परिसरात फिरत…
कोल्हापूर दिनांक 30 – कोल्हापूरच्या नवीन सुधारित विकास आराखडा नुसार तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजीपूल या रस्त्यावर उड्डाण पूल व अंतर्गत फ्लाय ओव्हर करण्यात येणार आहेत, तथापि तावडे हॉटेल ते सी पी आर चौक येथून खानविलकर पेट्रोल पंप 100 फुटी रोड,स्मशान भूमी ते छत्रपती शिवाजीपूल या मार्गे उड्डाण पूल फ्लायओव्हर करून जुना बुधवार पेठेला पर्यायी रस्ता करून जुना बुधवार पेठेत होणारी वाहतूक कोंडी,रहदारी,नागरिकांना रस्ता ओलडताना होणार त्रास ग्रामीण भागातून कामाला जाणाऱ्या येणाऱ्या गाडया वाहतूक,पर्यटक या सर्वातून मोकळा श्वास घेता यावा यासाठी लवकर पर्यायी रस्ता व्हावा या मागणीचे निवेदनमहानगरपालिका उपायुक्त पंडित पाटिल याना देण्यात आले या वेळी सुशिल भांदिगरे,अनिल पाटील,गणेश जाधव,रणजित…
कोल्हापूर दिनांक 27 – कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यासोबत गुन्ह्यांचा आढावा घेऊन अवैध जुगार,दारू,चेन स्नॅचिंग वर प्रभावी कारवाई कराव्यात अशी सूचना देऊन इतर प्रलंबित गुन्ह्यांवर ताबडतोब कारवाईसह इतर सूचना गुन्हे परिषदेत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत क्राइम मीटिंग च्या सुरुवातीस पोलिस महानिरीक्षक यांनी मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांनी दिलेल्या सूचना सांगून पोलिस अधीक्षक यांना शुभेच्छा दिल्या.पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेकडून वाहतुकीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील वाहतूक कशी सुरळीत होईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वाहतुकीच्या कारवाईबाबत जनतेकडून अभिप्राय घेतला जाईल असे सांगितले. पासपोर्ट तसेच चारित्र्य…
कोल्हापूर दि.27 (जिमाका): जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य पूर परिस्थितीची शक्यता गृहीत धरुन आपत्कालीन परिस्थितीसाठी चोख नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रभारी प्रशासक अमोल येडगे यांनी आज संबंधित सर्व अधिका-यांना दिल्या. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत रेड अलर्ट असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडीत पाटील, कपिल जगताप, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाने, कृष्णा…
*कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : दिनांक 27 मे 2025 रोजी जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात एकूण सरासरी 16.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यात 38.1 मिमी आणि गगनबावडा तालुक्यात 36.2 मिमी झाला आहे, तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 6.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.* *नैसर्गिक आपत्ती दिनांक 27 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यामधील नदी पातळी, धरण, वाहतूक व नुकसानाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे.* *नदी पातळी (पंचगंगा नदी): पंचगंगा नदीची पातळी (सकाळी 10 वाजेपर्यंत) खालीलप्रमाणे आहे.* राजाराम बंधारा: सद्याची पातळी 19.05 फूट (इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट). शिरोळ बंधारा: सद्याची पातळी 34.00 फूट (इशारा…
कोल्हापूर दिनांक 09 – उत्तराखंड येथून आलेले युवक कार्तिक सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असीम प्रेम व निष्ठा व्यक्त करत एक अद्वितीय आणि प्रेरणादायी मोहिम हाती घेतली आहे. त्यांनी सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे गड-किल्ले पादाक्रांत करण्याचा संकल्प केला असून, आतापर्यंत त्यांनी ५२ किल्ल्यांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. सध्या ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेऊन शिवभक्तीत न्हालेल्या वातावरणात पुढील प्रवासास निघाले आहेत. त्यांच्या या अद्वितीय कार्याचा सकल हिंदू समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर येथे उत्साहात सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला उदय भोसले, किशोर घाटगे, अभिजीत पाटील, अर्जुन आंबी यांसारखे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.…
कोल्हापूर दिनांक 05 – तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर मार्गावर छत्रपती शाहू महाराजांनी श्री दत्त महाराजांच्या महापूजा धूप आरती वेळी सनई-चौघडा व नगारा वाजवण्याची ऐतिहासिक परंपरा सुरू केली होती ती बंद केली असल्याने पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेवक समिती महाराष्ट्र यांच्यावतीने अध्यक्ष सागर धनवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तीर्थक्षेत्र दत्तमंदिर मार्गावर सि. स. नंबर 469 व लगत जागेवर राजर्षी छ. शाहू महाराजांनी करवीर संस्थानातून जागा देऊन नगारखाना व धर्मशाळा बांधून तिथे श्री दत्त महाराजांची महापूजा धूप आरतीवेळी नित्यनेमाने 3 वेळेस सनई चौघडा व नगारा वाजवण्याची ऐतिहासिक परंपरा सुरू केली होती.सदरच्या परंपरा अखंडपणे चालू होत्या परंतु काही कारणास्तव ट्रस्ट…
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): कोल्हापूरच्या विकासासाठी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा मंदिर परिसर विकास आराखडा, सर्किट बेंच, विमानतळ आदी सर्व विषय गतीने मार्गी लावण्यात येत आहेत. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया आणि राज्याच्या प्रगतीत कोल्हापूर जिल्हा अग्रभागी राहण्यासाठी सर्वजण सज्ज होवूया, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते झाला, याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त…
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारणा २०२१ व दत्तक नियमावली २०२२ नुसार १८ वर्षा आतील बालकांचे नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रिया व सावत्र पालक दत्तक प्रक्रियेचे कामकाज महिला व बाल विकास विभाग पाहत आहे. जिल्ह्यातील नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रिया व सावत्र पालक दत्तक प्रक्रिया करु इच्छिणा-या नागरिकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस. पी. ऑफीसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस. पी. ऑफीसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे माहितीसाठी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी…