कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलच्या परिसरातील पडसर जमीनीतील गवताची सन 2025 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीरांनी प्रत्यक्ष पहाणी करुन आपली दरपत्रके सिलबंद लिफाफ्यासह दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावीत, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ले. कर्नल. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
प्राप्त सिलबंद लिफाफ्यातील जास्तीत जास्त रक्कम असणा-या दरपत्रकास मान्यता देण्यात येईल. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0231-2665812 किंवा व्हाट्स अँप क्र. 9172035612 वर संपर्क साधावा.
