कोल्हापूर दिनांक 30 – कोल्हापूरच्या नवीन सुधारित विकास आराखडा नुसार तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजीपूल या रस्त्यावर उड्डाण पूल व अंतर्गत फ्लाय ओव्हर करण्यात येणार आहेत, तथापि तावडे हॉटेल ते सी पी आर चौक येथून खानविलकर पेट्रोल पंप 100 फुटी रोड,स्मशान भूमी ते छत्रपती शिवाजीपूल या मार्गे उड्डाण पूल फ्लायओव्हर करून जुना बुधवार पेठेला पर्यायी रस्ता करून जुना बुधवार पेठेत होणारी वाहतूक कोंडी,रहदारी,नागरिकांना रस्ता ओलडताना होणार त्रास ग्रामीण भागातून कामाला जाणाऱ्या येणाऱ्या गाडया वाहतूक,पर्यटक या सर्वातून मोकळा श्वास घेता यावा यासाठी लवकर पर्यायी रस्ता व्हावा या मागणीचे निवेदनमहानगरपालिका उपायुक्त पंडित पाटिल याना देण्यात आले या वेळी सुशिल भांदिगरे,अनिल पाटील,गणेश जाधव,रणजित शिंदे,संतोष दिंडे,शशिकांत हळद कर,किसन पाटिल,पपु नाईक,अक्षय घाटगे,आनंदराव पाटिल सर,विवेक नलवडे,संदेश भोसले,मधुकर पाटिल मामा,शशिकांत जाधव,आदी उपस्थित नागरिक होते
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
