कोल्हापूर दिनांक 05 – तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर मार्गावर छत्रपती शाहू महाराजांनी श्री दत्त महाराजांच्या महापूजा धूप आरती वेळी सनई-चौघडा व नगारा वाजवण्याची ऐतिहासिक परंपरा सुरू केली होती ती बंद केली असल्याने पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेवक समिती महाराष्ट्र यांच्यावतीने अध्यक्ष सागर धनवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तीर्थक्षेत्र दत्तमंदिर मार्गावर सि. स. नंबर 469 व लगत जागेवर राजर्षी छ. शाहू महाराजांनी करवीर संस्थानातून जागा देऊन नगारखाना व धर्मशाळा बांधून तिथे श्री दत्त महाराजांची महापूजा धूप आरतीवेळी नित्यनेमाने 3 वेळेस सनई चौघडा व नगारा वाजवण्याची ऐतिहासिक परंपरा सुरू केली होती.सदरच्या परंपरा अखंडपणे चालू होत्या परंतु काही कारणास्तव ट्रस्ट कायद्याने नोंदणीकृत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या ट्रस्टला 1986 च्या आसपास जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शासन अटी शर्ती नियमाने तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित केले.परंतु त्यानंतर शासन खातरजमा न करता सदरची ऐतिहासिक परंपरा बंद करण्यात आल्या आहेत.कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिर, वाडी रत्नागिरी जोतिबा मंदिर,तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिर याठिकाणी या परंपरा चालू असताना नृसिंहवाडी येथील परंपरा बंद का? असा सवाल शिवसेवक समिती महाराष्ट्र यांच्यावतीने करण्यात आला असून छत्रपती शाहू महाराज यांच्या 6 मे रोजी असणाऱ्या पुण्यतिथी दिवशी सदरच्या परंपरा चालू करण्याची घोषणा करून 25 जून रोजी असणाऱ्या छत्रपती शाहू महाराज जयंती पासून सदरची परंपरा सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
