कोल्हापूर दिनांक 27 – कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यासोबत गुन्ह्यांचा आढावा घेऊन अवैध जुगार,दारू,चेन स्नॅचिंग वर प्रभावी कारवाई कराव्यात अशी सूचना देऊन इतर प्रलंबित गुन्ह्यांवर ताबडतोब कारवाईसह इतर सूचना गुन्हे परिषदेत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
याबाबत क्राइम मीटिंग च्या सुरुवातीस पोलिस महानिरीक्षक यांनी मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांनी दिलेल्या सूचना सांगून पोलिस अधीक्षक यांना शुभेच्छा दिल्या.पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेकडून वाहतुकीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील वाहतूक कशी सुरळीत होईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वाहतुकीच्या कारवाईबाबत जनतेकडून अभिप्राय घेतला जाईल असे सांगितले. पासपोर्ट तसेच चारित्र्य पडताळणीबाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन त्यांचेकडून देखील अभिप्राय घेतला जाईल असे सांगितले.जिल्ह्यातील महिलाविषयक सर्व गुन्ह्यांचा आढावा घेऊन सर्व गुन्ह्यातील पीडित बालिका लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे याबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले.
तसेच बकरी ईदच्या अनुषंगाने आढावा घेऊन लावण्यात येणारी नाकाबंदी. कत्तलखाने याची माहिती घेऊन सर्व प्रभारी अधिकारी यांनी कोणत्याही घटनेला तात्काळ प्रतिसाद देणे आवश्यक आहे याबाबत सूचना दिल्या.जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हे, अर्ज याचा आढावा घेऊन तात्काळ निर्गती करण्याचे आदेश दिले.महिला शाखेच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन प्रलंबित गुन्हे अर्ज याची माहिती घेऊन त्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.निर्भया पथकाची कामगिरी चा आढावा घेण्यात आला शिकवणीची ठिकाणे, बस स्टँड, शाळा, कॉलेज यामध्ये सतर्क गस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. तसेच कोणालाही विनाकरण त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कौन्सिलिंग देखील कराव्यात याबाबत सूचना देण्यात आल्या.त्याचप्रमाणे जुगार, दारू, NDPS या कारवाई मध्ये वाढ अपेक्षित असून प्रभावी कारवाई करावी.चैन स्नॅचिंग च्या गुन्ह्यांना प्रतिबंध करावा तसेच सर्व गुन्हे उघडकीस आणावे असे आदेश पोलिस अधीक्षक यांनी उपस्थित सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
