Author: admin

कोल्हापूर, दि. १५ (जिमाका) : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंतच्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. कार्यालय प्रमुखांसह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत वैयक्तिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. या मोहिमेत कार्यालय परिसरातील गवत, झुडपे व कचरा काढणे, कार्यालयाची स्वच्छता, दप्तराचे निंदणीकरण,सहा गठ्ठे पध्दती, अभिलेख कक्षातील सर्व दस्तऐवज सुव्यवस्थित लावून घेणे, जाळे-जळमटे व धूळ काढणे, तसेच अनावश्यक कागदपत्रे, निकामी साहित्य व इतर अनावश्यक वस्तुंची नियमानुसार विल्हेवाट लावणे…

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रामध्ये सण, समारंभ व उत्सवांच्या कालावधीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन, तपासणी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे किमान 7 दिवस अगोदर तपासणी दिनांकास दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सन 2026 साठी दोन स्वतंत्र संनियंत्रण समितींची नियुक्ती केली आहे. कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूरसाठी- मोसमी चौगुले, उपविभागीय अधिकारी करवीर उपविभाग, कोल्हापूर यांची अध्यक्ष तर किरण धनवडे, उपायुक्त, कोल्हापूर महानगरपालिका व प्रिया पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हापूर शहर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजीसाठी – दिपक शिंदे, उपविभागीय अधिकारी इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी यांची अध्यक्ष तर…

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रामध्ये सण, समारंभ व उत्सवांच्या कालावधीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन, तपासणी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे किमान 7 दिवस अगोदर तपासणी दिनांकास दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सन 2026 साठी 13 स्वतंत्र संनियंत्रण समित्या नियुक्त केल्या आहेत. वडगांव नगरपरिषद- सुमित जाधव, मुख्याधिकारी, वडगांव नगरपरिषद यांची अध्यक्ष तर विजय घेरडे, पोलीस निरीक्षक, वडगांव पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, वडगांव नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हुपरी नगरपरिषद – अजय नरळे, मुख्याधिकारी, हुपरी नगरपरिषद यांची अध्यक्ष तर सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक, हुपरी पोलीस ठाणे…

Read More

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले. महाराष्ट्र शासनाने १४ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’म्हणून घोषीत केल्यामुळे या उत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. परंतू हा उत्सव साजरा करताना नागरिकांची सुरक्षितता, कायद्याचे पालन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे. आपल्या आनंदामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी भक्तिभाव कायम ठेवून शिस्तबद्ध रीतीने आणि सामाजिक भान जपून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे काळाची गरज आहे.. ! राज्य महोत्सवातून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश- राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानंतर यंदाच्या वर्षी हा…

Read More

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर कल्याण व पुनर्वसनाच्या दृष्टीने योजना व सवलतीची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथील कल्याण संघटक यांचा माहे सप्टेंबर 2026 चा मासिक दौरा आयोजित केला आहे. संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे. कल्याण संघटकांचा दौरा पुढीलप्रमाणे- 10 सप्टेंबर रोजी दुसरा गुरुवार, तहसील कार्यालय, गडहिंग्लज येथे प्रकाश आनंदा गुरव, अ.सहा.व.अ. उपस्थित राहतील. 16 सप्टेंबर रोजी तिसरा बुधवार तहसील कार्यालय, चंदगड येथे सुहास कांबळे, कल्याण संघटक उपस्थित राहतील.…

Read More

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : केंद्रीय रेशीम मंडळातर्फे मेरा रेशीम मेरा अभिमान उपक्रमांतर्गत क्षेत्रीय भेट व बिज कोष उत्पादन, अंडीपुंज उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व याविषयी कार्यक्रम दि अंडीपुंज उत्पादन केंद्र, गडहिंग्लज येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. एन. चंद्रकांत यांनी विशेष तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अंडीपुंज उत्पादन केंद्राचे प्रमुख डॉ. बी.एम. खंडागळे, कोल्हापूर जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पी. जी. निकम, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक एस. आर. पाटील, अंडीपुंज उत्पादन करणारे कामगार, बिज कोष उत्पादक शेतकरी, गडहिंग्लज कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद येथे गृहप्रमुख (बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू तसेच दोन वर्षाचा गृहप्रमुख पदाचा अथवा तत्सम अनुभव असल्यास प्राधान्य) या एका पदासाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कामाचा अंदाजित खर्च 3 लाख 9 हजार 925 रुपये तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राधानगरी येथे एक सफाई कामगार 11 महिन्यांच्या कालावधीसाठी एक लाख 30 हजार 152 रुपये अंदाजित खर्च असून वरील पदे भरावयाची आहेत. ही कामे गगनबावडा व राधानगरी तालुक्यातील असून याप्रमाणे कामे करण्यास इच्छुक तालुका, कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणा-या कार्यरत व नमुद अटी व शर्ती पूर्ण करणा-या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी नमूद कंत्राटी पदांसाठी 28 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयानुसार…

Read More

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यातील दुधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी हे मोठे प्रकल्प, कडवी, कासारी, कुंभी व धामणी हे मध्यम प्रकल्प तसेच लघु प्रकल्पांतर्गत नद्यांवर शासनाने बांधलेल्या को.प. बंधाऱ्यांमधून पाणी घेणाऱ्या सहकारी पाणीपुरवठा संस्था, वैयक्तिक बागायतदार आणि बिगरसिंचन ग्राहकांसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १ जुलै २०२६ ते ३० जून २०२९ या नियंत्रण कालावधीसाठी ठोक जलप्रशुल्क निश्चित केले आहे. दिनांक १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या कालावधीसाठी सिंचन व बिगरसिंचन पाणी वापराचे सुधारित दर लागू राहतील. १ जुलै २०२७ ते ३० जून २०२८ या कालावधीत निर्धारित दरांमध्ये १० टक्के, तर १ जुलै २०२८ ते ३० जून २०२९ या…

Read More

कोल्हापूर, दि. ७ (जिमाका) : अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय लष्कराच्या कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयामार्फत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे १७ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लष्कर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतानाच देशसेवेची संधी मिळावी, हा या भरती मेळाव्याचा उद्देश आहे. या भरती प्रक्रियेत अग्निवीर जनरल ड्युटी (ऑल आर्म्स), अग्निवीर टेक्निकल (ऑल आर्म्स) तसेच अग्निवीर ट्रेड्समन (ऑल आर्म्स) १० वी व ८वी उत्तीर्ण पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी तसेच गोवा राज्यातील उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्ह्यातील अधिवासी उमेदवार या भरतीसाठी…

Read More

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजीमार्फत आगाऊ दोन चाकी MH५१K ही नोंदणी मालिका 9 सप्टेंबरपासून नियमित सुरु करण्यात येत आहे. नवीन दोन चाकी MH५१K पसंती क्रमांकाचे अर्ज 9 व 10 सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ ते ३ या वेळेत कार्यालयात स्विकारण्यात येतील, अशी माहिती इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली. वाहन नोंदणी क्रमांकांची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावे. पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातीलच असणे आवश्यक आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश (Cheque) किंवा पेऑर्डर…

Read More