
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर कल्याण व पुनर्वसनाच्या दृष्टीने योजना व सवलतीची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथील कल्याण संघटक यांचा माहे सप्टेंबर 2026 चा मासिक दौरा आयोजित केला आहे. संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
कल्याण संघटकांचा दौरा पुढीलप्रमाणे- 10 सप्टेंबर रोजी दुसरा गुरुवार, तहसील कार्यालय, गडहिंग्लज येथे प्रकाश आनंदा गुरव, अ.सहा.व.अ. उपस्थित राहतील. 16 सप्टेंबर रोजी तिसरा बुधवार तहसील कार्यालय, चंदगड येथे सुहास कांबळे, कल्याण संघटक उपस्थित राहतील.
तहसिलदार यांच्या कार्यालयातील सर्व दौरे निर्देशित ठिकाणी होतील. या दिवशी शासकीय किंवा इतर सुट्टी असल्यास त्या तालुक्याचा दौरा पुढील महिन्यात घेण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
00000