
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रामध्ये सण, समारंभ व उत्सवांच्या कालावधीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन, तपासणी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे किमान 7 दिवस अगोदर तपासणी दिनांकास दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सन 2026 साठी 13 स्वतंत्र संनियंत्रण समित्या नियुक्त केल्या आहेत.
वडगांव नगरपरिषद- सुमित जाधव, मुख्याधिकारी, वडगांव नगरपरिषद यांची अध्यक्ष तर विजय घेरडे, पोलीस निरीक्षक, वडगांव पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, वडगांव नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हुपरी नगरपरिषद – अजय नरळे, मुख्याधिकारी, हुपरी नगरपरिषद यांची अध्यक्ष तर सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक, हुपरी पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, हुपरी नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जयसिंगपूर नगरपरिषद- टिना गवळी, मुख्याधिकारी, जयसिंगपूर नगरपरिषद यांची अध्यक्ष तर संतोष गोरे, पोलीस निरीक्षक, जयसिंगपूर पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, जयसिंगपूर नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कुरुंदवाड नगरपरिषद- मनोजकुमार देसाई, मुख्याधिकारी, कुरुंदवाड नगरपरिषद यांची अध्यक्ष तर संतोष माने, सहा. पोलीस निरीक्षक, कुरुंदवाड पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, कुरुंदवाड नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शिरोळ नगरपरिषद- निशिकांत प्रचंडराव, मुख्याधिकारी, शिरोळ नगरपरिषद यांची अध्यक्ष तर गोरख चौधर, पोलीस निरीक्षक, शिरोळ पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, शिरोळ नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कागल नगरपरिषद – अजय पाटणकर, मुख्याधिकारी, कागल नगरपरिषद यांची अध्यक्ष तर अजित जाधव, पोलीस निरीक्षक, कागल पोलीस ठाणे कार्यालय व अधिक्षक, कागल नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुरगुड नगरपरिषद – अतिश वाळूंज, मुख्याधिकारी, मुरगुड नगरपरिषद यांची अध्यक्ष तर क्रांती पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, मुरगुड पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, मुरगुड नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पन्हाळा नगरपरिषद- चेतनकुमार माळी, मुख्याधिकारी, पन्हाळा नगरपरिषद यांची अध्यक्ष तर नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक, पन्हाळा पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, पन्हाळा नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मलकापूर नगरपरिषद- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद यांची अध्यक्ष तर राजेंद्र सावंत्रे, पोलीस निरीक्षक, शाहुवाडी पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, मलकापूर नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गडहिंग्लज नगरपरिषद – देवानंद ढेकळे, मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपरिषद यांची अध्यक्ष तर सतीश होडगर, पोलीस निरीक्षक, गडहिंग्लज पोलीस ठाणे कार्यालय अधिक्षक, गडहिंग्लज नगरपरिषद व कार्यालय अधिक्षक, गडहिंग्लज नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आजरा नगरपंचायत – सुरज सुर्वे, मुख्याधिकारी, आजरा यांची अध्यक्ष तर बाळासाहेब सरवदे, सहा. पोलीस निरीक्षक, आजरा पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, आजरा नगरपंचायत यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चंदगड नगरपंचायत- शिल्पाराणी जाधव, मुख्याधिकारी, चंदगड यांची अध्यक्ष तर निंगप्पा चौखंडे, पोलीस निरीक्षक, चंदगड पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, चंदगड नगरपंचायत यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हातकणंगले नगरपंचायत- विशाल पाटील, मुख्याधिकारी, हातकणंगले यांची अध्यक्ष तर सचिन सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक, हातकणंगले पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, हातकणंगले नगरपंचायत यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वरील अधिकारी रजा/बदली/कार्यभार बदल अथवा अन्य कारणांमुळे अनुपस्थित असल्यास, त्यांचा कार्यभार ज्या अधिकाऱ्यांचेकडे सोपविण्यात येईल, त्या अधिकाऱ्यांनी या आदेशानुसार कामकाज पार पाडावयाचे आहे.
नियुक्त संनियंत्रण समित्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका/ नगरपरिषद / नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सण, समारंभ व उत्सवांचे कालावधीमध्ये उभारण्यात येणारे मंडपांची तपासणी करुन, तपासणी अहवाल त्याचदिवशी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
0000