
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : केंद्रीय रेशीम मंडळातर्फे मेरा रेशीम मेरा अभिमान उपक्रमांतर्गत क्षेत्रीय भेट व बिज कोष उत्पादन, अंडीपुंज उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व याविषयी कार्यक्रम दि अंडीपुंज उत्पादन केंद्र, गडहिंग्लज येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. एन. चंद्रकांत यांनी विशेष तांत्रिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी अंडीपुंज उत्पादन केंद्राचे प्रमुख डॉ. बी.एम. खंडागळे, कोल्हापूर जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पी. जी. निकम, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक एस. आर. पाटील, अंडीपुंज उत्पादन करणारे कामगार, बिज कोष उत्पादक शेतकरी, गडहिंग्लज कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
0000