Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी 19 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत SSB कोर्स क्र. 67 छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या मोफत प्रशिक्षणासाठी 12 ऑक्टोबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मुलाखतीस हजर रहावे. या कोर्स कालावधील प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील SSB -67…
पौष्टिक आहारातून निरोगी जीवनशैलीचा संदेश; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) : सेवा संकल्प अभियान व पोषण माहनिमित्त गारगोटी, ता. भुदरगड येथे भरड धान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी स्पर्धेला भेट देऊन सहभागी महिला व नागरिकांशी संवाद साधला. भरड धान्याचा आहारातील वापर वाढवून पौष्टिक व संतुलित आहाराच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेत महिलांनी भरड धान्यापासून विविध पौष्टिक व रुचकर पदार्थ तयार करून सादर केले. दैनंदिन आहारात भरड धान्याचा समावेश केल्यास कुटुंबाच्या पोषण व आरोग्याला चालना मिळते, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. 0000
स्थानिक साधनसामग्रीचा वापर; महिलांना रोजगाराची संधी, कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत पन्हाळा तालुक्यातील केखले येथील रेणुका महिला बचत गटाने उदबत्ती निर्मितीचा व्यवसाय सुरू करून महिला सक्षमीकरणाचा आदर्श निर्माण केला आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून उदबत्ती निर्मितीला सुरुवात केल्याने महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. महिलांनी एकत्रितपणे उदबत्ती निर्मितीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात केली. तयार करण्यात आलेल्या उदबत्त्यांची स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जात आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्याला व्यावसायिक स्वरूप मिळाले असून, कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याबरोबरच स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा आत्मविश्वासही त्यांच्यात निर्माण…
कोल्हापूर, दि. २ (जिमाका) : शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी-केंद्रित, कृतीआधारित तसेच स्थानिक गरजांशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच समाजाच्या सहभागातून जनजागृती करण्यावर या उपक्रमांतून भर देण्यात येत आहे. ‘विकसित भारत’या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे तसेच व्हिडिओंचे तालुका व जिल्हास्तरावर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये हे उपक्रम घेण्यात येत आहेत. अभियानांतर्गत २ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरावर मानवी रांगोळी…
कोल्हापूर, दि. 1 (माध्यम कक्ष) : महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ व्दिवार्षिक निवडणूक-2026 च्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियात प्रसारित करण्यात येणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी सदर जाहिराती प्रमाणित करूनच प्रसारित कराव्यात. तसेच, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनीही जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबीची खात्री करुन घ्यावी. टीव्ही, केबल नेटवर्क/ केबल चॅनेल्स, सिनेमा हॉल्स, आकाशवाणी, रेडिओ, एफएम वाहिन्या, सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या ऑडिओ-व्हिडीओ व्हिज्युअल्स जाहिराती, ई न्यूजपेपरवरील जाहिराती, बल्क एसएमएस किंवा व्हॉईस मेसेजेस, सोशल…
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी सेवा रुग्णालय, कसबा बावडा या ठिकाणी मानसिक आरोग्य ताणतणाव मुक्ती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मानसिक आजार असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी, समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. हे शिबीर स. 9 ते दु. 1 या वेळेत होणार आहे. मानसिक आजार असलेल्या रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्पणा कुलकर्णी यांनी केले आहे. **
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : इयत्ता 11 वी, 12 वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2025-26 मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी योजनेचा ऑनलाईन अर्ज नूतनीकरण (Renew) करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन करताना आधार ओटीपी पडताळणी तसेच पासवर्ड रिसेट करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्जाचे नूतनीकरण करता आलेले नाही. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12…
पुणे, दि. 29: भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीची मतदान पद्धती आणि आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या अन्य सार्वत्रिक निवडणुकातील मतदानाची पद्धती यात मूलभूत फरक आहे. विधानपरिषद निवडणूकीचे मतदान हे मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवून घेण्यात येते. जितके उमेदवार निवडणूक लढवित असतील अशा सर्वांपुढे पसंतीक्रम नोंदविता येतो. मतदानाच्या या वेगळ्या पद्धतीमुळे मतदारांनी आणि विशेषत: प्रथमच मतदान करणाऱ्यांनी ही पद्धत जाणून योग्यरितीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे. असे करा मतदान: मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेबरोबर पुरवलेले जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरावे. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन…
कोल्हापूर, दि. १ (जिमाका) : ‘सेवा परमो धर्मः’ या संकल्पनेतून प्रेरित सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी बालक व महिलांच्या संरक्षणासह कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि संबंधित कर्मचाऱ्यांना बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, POCSO कायदा तसेच विविध हेल्पलाईन सेवांची माहिती देण्यात आली. गारगोटी, गडहिंग्लज, कागल, हातकणंगले, शिरगाव, शाहूवाडी, भोगावती, पोर्ले तर्फ बोरगाव आणि कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमांतून बालमजुरी, बालभिक्षेकरी, बालविवाह प्रतिबंध तसेच महिला व बालकांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाहूवाडी आणि भोगावती येथे विद्यार्थ्यांनी बालविवाह रोखण्याची प्रतिज्ञा घेतली. पोर्ले तर्फ बोरगाव येथील कांदबरी हायस्कूलमध्ये सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच महिला हेल्पलाईन 181,…
कोल्हापूर, दि. 1 दिनांक २९-३० सप्टेंबर रोजी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) तसेच जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या Raising and Accelerating MSME Performance (RAMP) कार्यक्रमासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) ने फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) यांच्या सहकार्याने २९ व ३० सप्टेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथील सयाजी हॉटेल येथे आयोजित केलेली ७ वी रिव्हर्स बायर-सेलर मीट (RBSM) यशस्वीरित्या पार पाडली. या RBSM चे प्रमुख उद्दिष्ट MSME उद्योगांची निर्यातसज्जता वाढविणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश सुलभ करणे आणि MSME क्षेत्राची जागतिक स्पर्धात्मकता अधिक बळकट करणे हे होते. या कार्यक्रमात २७ देशांतील ५२ आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी…