Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): गंभीर आजाराने त्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक पाऊल म्हणून जिल्ह्यात पेलिएटिव्ह (उपशामक) केअर सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा पेलिएटिव्ह केअर समिती स्थापन करण्यात आली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील व डॉ. प्रविण नाईक…
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): केंद्र शासनाकडून रस्ते अपघातग्रस्तांना सुवर्ण तासात (Golden Hour) तातडीने वैद्यकीय मदत मिळावी आणि मदत करणाऱ्या नागरीकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने राह-वीर योजना राबविण्यात येत आहे. देशात रस्ते अपघात ही गंभीर सामाजिक व आर्थिक समस्या असून देशामध्ये दरवर्षी सुमारे 10 टक्के वाहनसंख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर अपघात व मृत्युची संख्या सुध्दा वाढत आहे. या पार्श्वभुमीवर अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करणे, समाजात मानवतेची भावना वाढविणे व जनतेस प्रेरणा देऊन निरपराध जीव वाचविण्यास प्रवृत्त करणे, असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत ज्या व्यक्तीने मोटार वाहन अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीस अपघातानंतर एका तासाच्या आत (Golden Hour)…
कोल्हापूर दिनांक 12 – कोल्हापूर शहरातील कदमवाडी ते जाधववाडी रस्त्यालगत असणाऱ्या पुरबाधित जागेत भरदिवसा भराव टाकण्याचे काम सुरू असून त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाश्यांना पूर परिस्थितीत गंभीर धोका निर्माण होणार असल्याने महानगरपालिकेकडून याबाबत कारवाई होणार का याबाबत नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. कदमवाडी जाधववाडी या रस्त्यालगत असणाऱ्या जागेत पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याचे कित्येक वर्षे दिसून येते.त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या अपार्टमेंट व घरांमध्ये दरवर्षी पाणी घुसते.या पुरबाधित जागेतून पलिकडे पाणी न जाता ते पाणी येथेच साचून राहते.त्यात आता याच क्षेत्रात कोणीतरी भराव टाकण्याचे काम करत असून त्यामुळे थोडा जरी पूर आला तरी यामुळे आजूबाजूच्या रहिवाश्यांना धोका निर्माण होऊन पाणी घरात घुसण्याची…
कोल्हापूर, दि 12 ( जिमाका) : हिंद – की – चादर अर्थात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी .समागम शताब्दीनिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य शासनाने क्षेत्रीय आयोजन समिती गठीत केली आहे . या समितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आठ सदस्यांचा समावेश आहे. खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोल्हापूर वासियांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग कशा पद्धतीने नोंदविता येईल यासाठी विचारविनिमय करण्यासाठी विभागीय माहिती कार्यालय या ठिकाणी शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी क्षेत्रीय समितीतील सर्व…
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आगामी 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत परळी वैजनाथ (जि. बीड) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय पशुपक्षी महा पशुधन एक्स्पो 2026 प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे अनावरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. प्रमोद बाबर व इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. लोगो अनावरणानंतर जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे प्रदर्शन हे देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातील…
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण 2 हजार 691 मतदान केंद्रांवर 74.35 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.* जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 23 लाख 40 हजार 199 मतदारांपैकी 8 लाख 94 हजार 115 पुरुष मतदार, 8 लाख 45 हजार 857 महिला मतदार तसेच इतर 35 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण 17 लाख 40 हजार 7 मतदारांनी मतदान केले आहे. शाहुवाडी तालुक्यातील पुरुष 60 हजार 336 स्त्री 57 हजार 33 इतर 0 एकूण 73.76 टक्केवारी… पन्हाळा तालुक्यातील पुरुष 87 हजार 682 स्त्री 79 हजार…
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी विनिर्दिष्ट ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या मतदारसंघासाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही किंवा सभा घेता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघ कार्यक्षेत्रात 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते मतदानादिवशी 7 फेब्रुवारी रोजी मतदान संपेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे…
कोल्हापूर, दि. 04 (जिमाका): जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती दि.05 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे एक दिवस अगोदर दि. 06 फेब्रुवारी 2026 आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 07 फेब्रुवारी 2026 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी 07 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या तरतुदीनुसार जाहीर प्रचाराची मुदत मतदान सुरु होण्याच्या चोवीस तास आधी संपेल. तसेच निवडणूक काळातील जिल्ह्यात 5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी लागू आहे. त्यामुळे…
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठीचा प्रारंभिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये मतदानाचा दिनांक गुरुवार, दि. 05 फेब्रुवारी 2026 असा निश्चित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने सर्व मतदारांना मतदार चिठ्ठी लवकरात लवकर वितरीत करणे आवश्यक असल्याने मा. राज्य निवडणूक आयोगाच्या त्या वेळच्या कार्यक्रमानुसार मतदान दिनांक 05 फेब्रुवारी असे नमूद करून दि. 26 व 27 जानेवारी 2026 रोजी मतदान निहाय मतदार चिठ्ठी प्रिंट करण्यात येऊन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत मतदार चिठ्ठ्यांचे आगाऊ स्वरुपात वाटप करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती सार्वत्रिक…