कोल्हापूर दिनांक 12 – कोल्हापूर शहरातील कदमवाडी ते जाधववाडी रस्त्यालगत असणाऱ्या पुरबाधित जागेत भरदिवसा भराव टाकण्याचे काम सुरू असून त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाश्यांना पूर परिस्थितीत गंभीर धोका निर्माण होणार असल्याने महानगरपालिकेकडून याबाबत कारवाई होणार का याबाबत नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
कदमवाडी जाधववाडी या रस्त्यालगत असणाऱ्या जागेत पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याचे कित्येक वर्षे दिसून येते.त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या अपार्टमेंट व घरांमध्ये दरवर्षी पाणी घुसते.या पुरबाधित जागेतून पलिकडे पाणी न जाता ते पाणी येथेच साचून राहते.त्यात आता याच क्षेत्रात कोणीतरी भराव टाकण्याचे काम करत असून त्यामुळे थोडा जरी पूर आला तरी यामुळे आजूबाजूच्या रहिवाश्यांना धोका निर्माण होऊन पाणी घरात घुसण्याची शक्यता आहे.त्यामुळे महानगरपालिका याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे का याची चर्चा होताना दिसून येत आहे.हा नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबणार का अशी विचारणा होत आहे.त्यामुळे नवनिर्वाचित महापौर याची गंभीरपणे दखल घेऊन कारवाई करतील अशी अपेक्षा या भागातील नागरिकांना आहे.
