Author: admin

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर येथील कुक्कुट प्रक्षेत्रावर प्रशिक्षणार्थींसाठी वर्षभर कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नवीन सर्कीट हाऊस जवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.एम. राऊत यांनी केले आहे. यामध्ये 5 दिवस कुक्कुटपालन प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी 200 रुपये सेवाशुल्क, 15 दिवसासाठी 500 रुपये सेवाशुल्क असणार असून व ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने प्रशिक्षण असणार आहे. तर 30 दिवसासाठी 2 हजार रुपये व 6 महिन्यासाठी 4 हजार रुपये सेवाशुल्क असणार असून प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने असणार आहे. सर्व प्रशिक्षणासाठी आधार कार्ड, शिक्षण…

Read More

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृतीसाठी   सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी विभाग, कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन 2024-25 योजनेअंतर्गत शनिवार, दि. 22 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता मौजे कुर, ता. भुदरगड येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2025 पौष्टिक तृणधान्य रॅली व ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, ग्राहक तृणधान्यांचे संघ, विक्रेते, उद्योजक, अन्नप्रक्रिया उद्योजक तसेच शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व कृषी उपसंचालक नामदेव…

Read More

कोल्हापूर दिनांक 21 – डॉ हितेश गांधी यांचे आझाद गल्ली गुजरी येथे अरिहंत हॉस्पिटल आहे.काल एका रुग्णाकडे आधीची उधारी मागितली म्हणून काहींनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टर गांधी यांना जबर मारहाण केली.त्यामुळे संशयित गणेश काकडे याच्यासह 8 जणांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर संघटना निमा यांच्यावतीने अशा प्रवृत्तीमुळे डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देणे कठीण बनले असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे सदर आरोपींवर कडक कारवाई करून समाजात भयमुक्त वातावरणात वैद्यकीय सेवा देणेकामी कार्यवाही व्हावी.तसेच गुंडांकडून हॉस्पिटल तोडफोडीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.यावेळी निमा प्रेसिडेंट मुकुंद मोकाशी, के एम ए…

Read More

कोल्हापूर (जिमाका) दि : 20 येत्या मार्चअखेर सर्व बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले .जिल्हा सल्लागार समितीची जिल्हास्तरीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली.यावेळी ते बोलत होते . या आढावा बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीवकुमार सिंह, प्रबंधक आर्थिक समावेश आणि विकास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विशाल गोंडके, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी.एम. शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे आदी उपस्थित होते . ते पुढे म्हणाले ,आपला जिल्हा गुंतवणूकदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो . जिल्ह्यातील सर्व बँकांनी उद्योजकांना…

Read More

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : मतदार यादींची विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी मतदार याद्या अचूक व अद्ययावत व्हाव्यात, त्या संबंधित यंत्रणेने तयार कराव्यात असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. मतदार याद्या तयार करणे व सूचना मागविण्याच्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील विविध मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या याद्या अद्यावत असाव्या या दृष्टीने बीएलओ (BLO) चे ट्रेनिंग घेणार असल्याचे सांगून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या सूचना एकत्रित संकलित करुन निवडणूक आयोगाकडे पाठवणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.…

Read More

दि.२०/०३/२०२५ प्रेसनोट खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. ५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी घातलेली महाराष्ट्रातील एकतर्फी बंदी उठवावी आणि शेतकर्‍यांसह ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. अजुनही कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या अनेक भागात, भारत तीन ए मानांकनाचे ५० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर जसेच्या तसे पडून आहेत. परिवहन खात्याकडून नोंदणी करून घेतली जात नसल्यानं, हे ट्रॅक्टर शेतकर्‍यांना वापरता येत नाहीत. ही अडचण खासदार महाडिक यांनी नामदार गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकर्‍यांच्या आणि ग्रामीण भागातील अर्थकारणासाठी ट्रॅक्टर महत्वाची भूमिका बजावतात. कोल्हापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनकडून झालेल्या मागणीनुसार, खासदार महाडिक…

Read More

•अजूनही करा ऑनलाइन नोंदणी व जोडणी, करा पेपरचा सराव अन् द्या परीक्षा..! •कोणतेही परीक्षा शुल्क नाही. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वेळेत तीन तासांची परीक्षा. •साक्षरतेचे अधुरे स्वप्न साकार करण्याची संधी. प्रौढ शिक्षण ऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ या नावाने सुरू असलेल्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत चालू शैक्षणिक वर्षात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) ही परीक्षा रविवारी २३ मार्च रोजी महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आली आहे. साक्षर होण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची व असाक्षरतेचा कलंक पुसण्याची संधी या निमित्ताने पंधरा वर्षे व त्या पुढील जेष्ठांना मिळाली आहे. याबाबत उल्लास कार्यक्रमाचे राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर…

Read More

कोल्हापूर दिनांक 20- दोन दिवसापासून ठप्प झालेला गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत झाला मुख्य जलवाही नीला लागलेली गळती यशस्वीपणे दुरुस्त करण्यात आली असून संतुलन टाक्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता रोटेशन पद्धतीने सर्व 13 गावांना आळीपाळीने पाणीपुरवठा सुरू होणार आहे येत्या चार दिवसात संपूर्ण योजनेअंतर्गत सर्व तेरा गावांना नियमित पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे यासाठी शाखा अभियंता टी एम अंबानी पीएच गायकवाड संदीप गारगोटे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ठेकेदार माननीय सुभाष आकाराम पाटील राहणार श्रीराम कॉलनी कसबा बावडा आणि कर्मचारी विशेष परिश्रम घेतले तांत्रिक अडचणीवर मात करून पाणीपुरवठा पूर्ववत केल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये समाधान आहे

Read More

जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन, ग्राहक संरक्षण विषयावर विविध मान्यवरांनी मांडले विचार कोल्हापूर, दि.18 : ग्राहकांनी सजग राहून सदसद्विवेकबुद्धीचा वापर केला तर फसवणूक टळेल असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले. कमी तेच अधिक मानून, अधिकचे न मिळवता, आहे त्यावरच समाधान मानून कोणत्याही अमिषाला बळी पडू नका असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. त्या म्हणाल्या, ऑनलाईन विश्वासाठी आपण सावज असून, मोबाईलवर येणारी प्रत्येक लिंक समजून घेवून त्याबाबत खबरदारी घ्या. जेणेकरून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही. एआयमुळे ग्राहकांच्यापुढे अनेक आव्हाने उभी आहेत असून अधिकच्या मोबदल्यासाठी ग्राहकांची फसवणूक वाढत गेल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहात दरवर्षी होणाऱ्या 15 मार्चच्या…

Read More

कोल्हापूर दिनांक 18- राज्य कुस्तीगिर संघटनेच्यावतीने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करत, पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. या यशाबद्दल खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भिमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्याकडून पृथ्वीराज मोहोळला एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. पुढील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद मिळण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे विश्वराज महाडिक यांनी यावेळी सांगितले. मागील महिन्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळ या मल्लाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलाय. या कामगिरीनंतर पृथ्वीराजने भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांची आज कोल्हापुरात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्याबद्दल विश्वराज महाडिक यांनी…

Read More