कोल्हापूर दिनांक 22- कोल्हापूर मधील सर्जिकल भांडार विभाग सी पी आर रुग्णालय यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर अनुदानामधून सर्जिकल व लॅब किटची खरेदी चा 4 कोटी 87 लाखांचा ठेका व्हि एस एंटरप्राइजेस कोल्हापूर यांना बेकायदेशीरपणे दिल्याने जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
व्हि. एस. इंटरप्राइजेस चे मयुर लिंबेकर याने ESIC हॉस्पिटलचे बनावट लेटर तयार करून त्यावर खोटी सही केल्याने लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल आहे.तसेच याकामी मयुर लिंबेकर याला भ्रष्टाचारमध्ये साथ दिल्याबद्दल तत्कालीन आयुक्त व संचालक,मुंबई,तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष खरेदी समिती राहुल रेखावार,अधिष्ठाता डॉ प्रदीप दीक्षित, डॉ गिरीश कांबळे वैद्यकीय अधिक्षक,सुनीता धामटे,रमेश खेडेकर,सारंग ढवळे,आश्विन चव्हाण, डॉ प्रिया बुभाळकर या सर्वांच्यावर बडतर्फ करून कारवाई करण्याची मागणी केली.
तसेच या निवेदनात म्हटले आहे की,चार कोटी 87 लाख तीस हजार पाचशे रुपयांचे एकच टेंडर किंबहुना परचेस ऑर्डर काढणे गरजेचे होते. मात्र दहा लाखाच्या वरील रकमेसाठी ई टेंडर प्रक्रिया राबवणे व त्यास शासनाची मान्यता घ्यावी लागेल अशा प्रसंगी सर्व कागदपत्रांची पडताळणी शासनामार्फत केली जाईल व भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडेल. या दुष्ट हेतूने 4 कोटी 87 लाख 30 हजार 500 रुपयांचे एकच परचेस ऑर्डर न देता दहा लाखाच्या आतील म्हणजेच नऊ लाख 63 हजार 900 रुपयांच्या 50 परचेस ऑर्डर व पाच लाख 35 हजार 500 रुपयांची एक परचेस ऑर्डर एकाच व्यक्तीला म्हणजेच मयूर लिंबेकर ला देण्याचे नियोजन हे अगोदरच ठरलेले होते हे सिद्ध होत आहे. यास्तव तत्कालीन जिल्हाधिकारी व सर्व अधिकारी हे दोषी असून सुनियोजित पद्धतीने कट रचून भ्रष्टाचार करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल व आरोपीशी संगनमताने पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यमान अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे व संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी घटक यांना महाराष्ट्र नागरी सेवा कायदा 1979 द्वारे सर्व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करून त्यांचे विरुद्ध येणाऱ्या *तीन दिवसात* फौजदारी गुन्हा दाखल करावा. अन्यथा संपूर्ण कोल्हापूरची जनता घेऊन रस्त्यावरती उतरून मोठ्या प्रमाणात जन आक्रोश आंदोलन करण्यात येईल असे मनसेच्या वतीने सांगण्यात यावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले,शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या सह मनसैनिक उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
