कोल्हापूर दिनांक 20 – कुमार विद्या मंदिर केर्ले शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असणारा डिजिटल टीव्ही स्क्रीन हा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी ग्रामपंचायत ऑफिस केर्ले या ठिकाणी आणण्यात आला होता. प्रोजेक्ट दाखविल्यानंतर सदर डिजिटल टीव्ही स्क्रीन ही शाळेमध्ये पोहोच करणे गरजेचे होते मात्र गेली अनेक महिने ही डिजिटल टीव्ही स्क्रीन ग्रामपंचायत मध्ये तशीच पडून होती.
सदर बाब दि.15 ऑगस्ट 2025 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती शाखा केर्ले च्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली व शाळेतील मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान ही गंभीर बाब ध्यानात घेऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत मध्ये मा. ग्रामसेवक पाटील साहेब व क्लार्क मारुती गुरव साहेब यांना संबंधित गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर स्क्रीन ही शाळेमध्ये तात्काळ पोहोच करावी व मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी सकारात्मक चर्चा झाली.
यानंतर कुमार विद्या मंदिर केर्ले चे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांच्याशी देखील या टीव्ही स्क्रीन नसल्याने होणारे शैक्षणिक नुकसान निदर्शनास आणले तसेच या विषयी सकारात्मक चर्चा झाली व त्यासंबंधीचे निवेदन मुख्याध्यापक यांना देण्यात आले.
संघटनेच्या या भूमिकेची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत केर्ले यांच्याकडून सदर डिजिटल टीव्ही स्क्रीन ग्रामपंचायत केर्ले चे क्लार्क मारुती गुरव यांनी स्वखर्चाने काळजीपूर्वक सोमवार दि.18 ऑगस्ट 2025 रोजी ताबडतोब शाळेमध्ये पोहोच केली.
कार्यकर्ते शाळेमध्ये गेले असता त्यांना डिजिटल टीव्ही स्क्रीन वरती अभ्यास करणारी मुले ज्यावेळेस पाहायला मिळाले त्यावेळेस खूप समाधान वाटले यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोठा होता.
सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील मुलं ही शाळेमध्ये शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल शिक्षणापासून वंचित राहू नये ही भूमिका अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती शाखा केर्ले यांच्यावतीने घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांची ही समस्या संघटनेच्या व प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेने कायमस्वरूपी मार्गी लागली.
यावेळी केर्ले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.पाटील साहेब तसेच क्लार्क श्री.मारुती गुरव साहेब व कर्मचारी वर्ग तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी संघटनेच्या महत्वपूर्ण भूमिकेचे स्वागत करून सहकार्य केले.
या कार्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे शाखा अध्यक्ष आनंद शिंदे, उपाध्यक्ष रामचंद्र बबन माने व फिरोज नायकवडी, करवीर तालुका अध्यक्ष अरुण भोसले, कार्याध्यक्ष मनोज डोंगरे, संघटक श्री. उमेश कुंभार, ट्रॅव्हलिंग अध्यक्ष श्री. सचिन पिष्टे, सदस्य अभिजित नलवडे,संदिप नलवडे, बाबासाहेब कांबळे, श्री. रविंद्र निकम,.मारुती माने,श्री.मारुती मोहिते, आरीफ नायकवडी, पांडुरंग माने, .मनोज पोवार यांचे सहकार्य लाभले.