Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. २० : आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाने ऑगस्टअखेर पुनर्वसनासंदर्भातील सर्व बैठका घेऊन आवश्यक निर्णय व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्यात, तसेच सप्टेंबरअखेर प्रत्यक्ष पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश दिले. पाटबंधारे, पुनर्वसन आणि महसूल अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशांनुसार, आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील सर्व प्रकल्पग्रस्तांना न्याय देत सप्टेंबरअखेर पुनर्वसनाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारसंघातील विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, समरजितसिंह घाटगे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे,…
कोल्हापूर, दि. १८ : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी होते. आमदार अमल महाडिक, विजय जाधव, रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष तथा समन्वयक संजय पेंडसे, राजवर्धन जगदाळे, भरत सोमैय्या, हरिश्चंद्र धोत्रे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी युवराज पाटील, आयटीआयचे प्राचार्य महेश आवटे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार…
पर्यटकांसाठी सात धबधब्यांसह झिप लाईन, साहसी खेळ, चिल्ड्रेन्स पार्क आणि नव्या पर्यटन सुविधांची मेजवानी कोल्हापूर, दि. १८ : कोल्हापूर वन विभागांतर्गत गारगोटी वनपरिक्षेत्रातील सवतकडा धबधबा परिसरात पर्यटन विकासासाठी ‘वनपर्यटन राज्य योजना’ आणि ‘स्टेट इको-टुरिझम’ या निधीतून उभारण्यात आलेल्या विविध आधुनिक सुविधांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. निसर्ग पर्यटनाला साहसी पर्यटनाची जोड देत पर्यटकांसाठी झिप लाईन, विविध एडव्हेंचर स्पोर्ट्स, चिल्ड्रेन्स पार्क, सोव्हेनिअर शॉप तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सवतकडा परिसराच्या पर्यटन विकासाला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या सोव्हेनिअर शॉपचेही…
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना शेंडा पार्कमधील बैठकीत घेतला कामाच्या प्रगतीचा आढावा कोल्हापूर, दि. १८ : मौजे सांगाव येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय तसेच कागल येथील ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभाराव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पाणी, वीज, रस्ते आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत विशेष सतर्कता बाळगून आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील राजर्षी छत्रपती…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 साठी नामांकन अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभारून रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 13 जुलै 2026 पासून पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून इच्छुक उद्योजकांनी आपले नामांकन अर्ज 28 जुलै पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. जौंजाळ यांनी केले आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष असून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार देवून यशस्वी उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण उद्योगांना चालना मिळावी, नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन मिळावे…
• नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत पोलिसांकडून 124 गुन्हे दाखल • गोपनीय माहिती देण्यासाठी 9822766100 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन • #नशामुक्तकोल्हापूर हा असेल अधिकृत सोशल मीडिया हॅशटॅग कोल्हापूर, दि. 17 : जिल्ह्यात ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानांतर्गत प्रत्येक स्तरावर जनजागृतीसह विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत पोलिस विभागाने आतापर्यंत 124 गुन्हे दाखल करून सुमारे 84 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, येत्या 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये नशामुक्तीचे ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी, मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग-गारूडी, मांग-गारोडी, मादगी व मादिंगा या 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना जेष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थी/विद्यार्थीनींनी 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ताराराणी…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या व परिवहन आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश अमराठी रिक्षाचालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान मिळावे, प्रवासी व रिक्षाचालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व्हावा तसेच मराठी भाषा संवर्धनाच्या शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी हा होता. कार्यक्रमात शासनाने नियुक्त केलेल्या प्रशिक्षकांनी अमराठी रिक्षाचालकांना दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे मराठी शब्द, वाक्यरचना, प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्याची पद्धत, शिष्टाचार तसेच व्यवहारिक मराठीचा योग्य वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी श्रीमती डॉ. ज्योती ठाकरे (माजी अध्यक्ष, राज्य महिला…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शनिवार 18 जुलै रोजी सकाळी 9.55 वाजता विमानाने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, सांगाव, शासकीय होमिओपॅथीक महाविद्यालय, पिंपळगाव येथील बांधकामाचा आढावा तसेच योग व निसर्गोपचार महाविद्यालय, उत्तूर येथील शासकीय महाविद्यालयाचा आढावा. (स्थळ : शेंडा पार्क) दुपारी 12 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षामार्फत आयोजित एसआयआर समिती आढावा बैठक व लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ता नियोजन बैठकीस उपस्थिती. (स्थळ : मार्केट यार्ड) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. रविवार, 19 जुलै रोजी सकाळी 7 वाजता…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 18 जुलै रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 14 खाजगी उद्योजकांकडून 568 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांकरीता किमान 8 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा, बी.टेक तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता विविध प्रकारची महामंडळे उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक…