
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी, मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग-गारूडी, मांग-गारोडी, मादगी व मादिंगा या 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना जेष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
इच्छुक विद्यार्थी/विद्यार्थीनींनी 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ताराराणी पुतळ्याजवळ, कोल्हापूर येथे प्रत्यक्षरित्या अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करावयाच्या मुदतीनंतर दिलेले किंवा प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जासोबत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा व जातीचा दाखला, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, रेशनकार्ड,आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स इ. कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रशांत तेलंग यांनी केले.
0000