
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शनिवार 18 जुलै रोजी सकाळी 9.55 वाजता विमानाने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, सांगाव, शासकीय होमिओपॅथीक महाविद्यालय, पिंपळगाव येथील बांधकामाचा आढावा तसेच योग व निसर्गोपचार महाविद्यालय, उत्तूर येथील शासकीय महाविद्यालयाचा आढावा. (स्थळ : शेंडा पार्क) दुपारी 12 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षामार्फत आयोजित एसआयआर समिती आढावा बैठक व लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ता नियोजन बैठकीस उपस्थिती. (स्थळ : मार्केट यार्ड) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार, 19 जुलै रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 11 वाजता पी.जी.शिंदे, गगनबावडा यांच्या घरी सांत्वनपर भेट. दुपारी 12 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आयोजित फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या गुणगौरव समारंभास उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
सोमवार, सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक. दुपारी 1 ते 6 वाजता राखीव. रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000