Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि 24 : (जिमाका) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने सन २०२६ साठी ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ या पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी आपली नामांकने ४ मे पूर्वी संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी केले . मधमाशीपालन व्यवसायाला चालना देणे व मधपाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडळाने ही पुरस्कार योजना गेल्या तीन वर्षांपासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत मधमाशीपालन क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशा क्रमांकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये एका पुरस्काराचे आरक्षण महिला मधपाळासाठी ठेवण्यात आले आहे. पुरस्कारांची रक्कम…
‘पुस्तक हा माणसाचा सर्वात जवळचा आणि प्रामाणिक मित्र असतो’, हे वचन आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत. मात्र, आजच्या धावपळीच्या युगात या वचनाची प्रचिती पुन्हा एकदा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज, २३ एप्रिल रोजी जगभर साजरा होणारा ‘जागतिक पुस्तक दिन’ ही आपल्यासाठी केवळ एक तारीख नसून, पुस्तकांच्या माध्यमातून स्वतःला शोधण्याची आणि समृद्ध करण्याची एक मोठी संधी आहे. युनेस्कोने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून घोषित केला. या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण याच दिवशी विल्यम शेक्सपिअर आणि मिगेल दे सर्व्हांतेस यांसारख्या जगप्रसिद्ध साहित्यिकांचा जन्म किंवा स्मृती जोडलेली आहे. जगभरात वाचन संस्कृती वाढवणे आणि ज्या लेखकांनी आपल्या…
कोल्हापूर, दि.२२* : देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाची सविस्तर माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे आणि जनगणना संचलनालयाचे जिल्हा समन्वयक तुषार पाटील उपस्थित होते. जनगणना ही धोरणात्मक व संख्यात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, या जनगणनेतील माहितीचा उपयोग देशातील विकास योजनांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करताना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले नागरिकांसाठी १ ते १५ मे…
कोल्हापूर, दि. २० : जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांसाठी राज्य सरकारने नुकताच एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी झालेल्या बैठकीत, दि. १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे मिशन मोडवर अधिकृतरीत्या नियमानुकूल करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल २९ हजार नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराची मालकी मिळणार असून, “अतिक्रमणधारक” हा शिक्का पुसून ते आता अधिकृत घरमालक होणार आहेत. १ मे २०२६ रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या लाभार्थ्यांच्या याद्यांचे वाचन करून या महाभियानाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव…
कोल्हापूर, दि. २० : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने सन २०२६ साठी ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ या पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी आपली नामांकने ४ मे पूर्वी संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी केले . मधमाशीपालन व्यवसायाला चालना देणे व मधपाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडळाने ही पुरस्कार योजना गेल्या तीन वर्षांपासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत मधमाशीपालन क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशा क्रमांकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये एका पुरस्काराचे आरक्षण महिला मधपाळासाठी ठेवण्यात आले आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे…
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळामार्फत आजपर्यंत सुमारे रु. 1,670 कोटींहून अधिक आर्थिक सहाय्य व्याज परतावा स्वरूपात वितरित करण्यात आले असून, राज्यातील 1 लाख 70 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महामंडळाची योजनांची कार्यवाही सुरु झाल्यापासून वर्षनिहाय फलनिष्पत्ती खालीलप्रमाणे आहे. सन 2017-18 -0, सन 2018-19- 2.60, सन 2019-20- 28.53, सन 20-21-63.55, सन 2021-22-118.29, सन 2022-23- 178.81, सन 2023-24- 301.02, सन 2024-25- 388.88 असा एकूण 1670.37 कोटी रुपये. लाभार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे योजनांविषयी अचूक, जलद आणि विश्वासार्ह माहिती मिळण्यासाठी…
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यासाठी आयसीआयसी बँक लि., श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या दोन कंपन्यांमधील 14 जागेच्या संधी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या आहेत. या योजनेचा लाभ हा 18 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवारांना दिला जाणार आहे. शिक्षण पूर्ण झालेल्या व कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या उमेदवारांसाठी आहे. पदवीधर उमेदवारांनी इंटर्नशिप संधीसाठी अर्ज करण्यासाठी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. या योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाईटवर प्रोफाईल तयार करुन विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा, उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिप अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल…
कोल्हापूर दि :16 (जिमाका ) जनसेवा करताना सामान्य नागरिकांसाठी पारदर्शकता,उत्तरदायित्व, कालबद्धता व कार्यक्षमता या बाबी वेळेत साध्य व्हाव्यात या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा बनविण्यात आला आहे . येत्या 28 एप्रिल रोजी हा दिवस ‘ सेवा हक्क दिन ‘ म्हणून महसूल विभागातर्फे जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे .याचा आढावा घेण्यासाठी आज एनआयसी सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना श्री गुरव म्हणाले,या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात या अधिनियमाबाबत तसेच राज्यसेवा आयोग आणि आपले सरकार पोर्टलमार्फत ऑनलाईन उपलब्ध सेवांबाबत नागरिकांनामध्ये जनजागृती करण्यात यावी तसेच हा दिन जन…
कोल्हापूर, दि. 15 : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे शुक्रवार, दि. 17 एप्रिल 2026 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शासन निधीतून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर शहरातील एसटीच्या नूतन छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह चार बसस्थानकांचे उद्घाटन होणार आहे. शुक्रवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 10.10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.20 वाजता शासकीय विश्रामगृह येथे प्रयाण, आगमन व राखीव. सकाळी 11 ते 11.20 वाजता कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे आगमन व बसस्थानकाची पाहणी. सकाळी 11.20 वाजता कोल्हापूर बस स्थानक येथून श्री क्षेत्र अंबाबाई मंदिराकडे प्रयाण. सकाळी 11.30 ते 12 वाजता श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर येथे आगमन व दर्शन. दुपारी…
कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत बँक मंजुरी स्तरावर “Reject for Incomplete Documents” अर्थात अपूर्ण कागदपत्रांमुळे Reject स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार आहेत. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित प्रकरण “Scrutiny” स्तरावर दिसेल. त्या ठिकाणी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी “Submit” पर्याय उपलब्ध होईल. “Submit” केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल व त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात, लाभार्थी व्याज परताव्यासाठी क्लेम सादर करत असताना कागदपत्रांमधील त्रुटींमुळे Hold स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसह दिसतील. अशा…