
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुला व मुलींचे वसतीगृह कोल्हापूर, सैनिकी मुलांचे वसतिगृह पन्हाळा आणि सैनिक आरामगृह कोल्हापूर साठी अशासकीय पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत.
सैनिकी मुलांचे वसतिगृह, कोल्हापूर येथे सहा. वसतिगृह अधिक्षक / लिपीक- 3 (पुरुष)- 24 हजार 875 रुपये एकत्रित मानधन, स्वयंपाकी- 6 (महिला)- 14 हजार 106 रुपये एकत्रित मानधन, सफाई कर्मचारी- 1 (पुरुष)- 13 हजार 271 रुपये एकत्रित मानधन, पहारेकरी- 1 (पुरुष)- -1 हजार 159 रुपये मानधन.
सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर येथे वसतिगृह अधिक्षीका- 1 (महिला)- 31 हजार 875 रुपये, वसतिगृह सहा. अधिक्षीका- 3 (महिला)- 24 हजार 875 रुपये, पहारेकरी- 1 (पुरुष)- 21 हजार 159 रुपये, स्वयंपाकी- 7 (महिला)- 14 हजार 106 रुपये, सफाई कर्मचारी- 1 (महिला)- 13 हजार 271 रुपये, माळी- 1 (महिला/ पुरुष)- 13 हजार 271 रुपये मानधन.
सैनिकी मुलींचे वसतिगृह पन्हाळा येथे वसतिगृह अधिक्षक / अशासकीय सहा. व्यवस्थापक- 1 (पुरुष)- 31 हजार 875 रुपये, पहारेकरी- 1 (पुरुष)- 21 हजार 159 रुपये मानधन.
सैनिकी आरामगृह, कोल्हापूर येथे 1 पुरुष सफाई कर्मचारी 13 हजार 271 रुपये मानधनावर भरावयाचा आहे.
वरील पदे ही तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर आहेत. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक 17 जूनपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून विहीत नमुन्यातच अर्ज सादर करावा. एका उमेदवाराने फक्त 1 (एका) पदासाठीच अर्ज करावा. अधिक अर्ज केल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज निरस्त केले जातील. प्राप्त अर्जाची पडताळणी करुन उमेदवारांना लाखतीसाठी मोबाईलव्दारे कळविण्यात येईल. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मोबाईल नंबर ९१७२०३५६१२ व दुरध्वनी क्रमांक ०२३१- २६६५८१२ वर संपर्क साधावा.
0000