
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : कृषी विभागामार्फत खरीप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अन्न धान्य पिक पौष्टिक तृणधान्य सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी गटासाठी नाचणी पिकांची प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. यासाठी बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पिक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था पात्र राहतील. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी गट व पात्र शेतक-यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.
यासाठी शेतक-यांचा फार्मर आयडी (Farmer (ID) असणे बंधनकारक आहे. बियाणांचा वापर पेरणीसाठी करणे बंधनकारक आहे. शेतकरी गट हा 31 मार्च पूर्वी नोंदणी केलेला असावा. अर्ज फक्त Mahadbt पोर्टलवरूनच स्वीकारले जातील. तालुकानिहाय व पिकनिहाय मंजूर लक्षांकानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. महा-डी.बी.टी. पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य (F.C.E.S) द्वारे लाभ देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त इच्छुक शेतकरी गटांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तांत्रिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सेवक किंवा तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.
0000
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.