
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : कृषी विभागामार्फत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यास खरीप तुर बीयाणे संच / सीडकीट ( वाण- गोदावरी तूर / BDN 2013-41) इच्छुक शेतक-यांना 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.
यासाठी शेतक-यांचा फार्मर आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे. बियाणांचा वापर पेरणीसाठी करणे बंधनकारक आहे. अर्ज फक्त Mahadbt पोर्टलवरूनच स्वीकारले जातील. महा-डी.बी.टी. पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य (F.C.F.S.) द्वारे लाभ देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तांत्रिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सेवक किंवा तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले.
००००
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.