Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. २० : राधानगरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शासकीय वसतिगृहात अनुसूचित जाती/जमाती,अपंग, अनाथ,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त भटक्या जमाती,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश नोंदणी सुरू करण्यात आली आहे. वसतिगृहामध्ये माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक ए. जी. पाटील यांनी केले आहे. या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून दरमहा निर्वाह,स्टेशनरी आणि गणवेश भत्ता तसेच छत्री व रेनकोट भत्ता दिला जातो.अद्ययावत संगणक कक्ष इंटरनेट सुविधेसह, सुसज्ज ग्रंथालय आणि इतर आवश्यक सुविधा…
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 19 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 2 जून च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व…
कोल्हापूर दिनांक 18 – केर्ली ता.करवीर येथे भोसले ग्राहक सेवा केंद्र बँक ऑफ बडोदा BC पॉईंट व कॅम्पुटर प्रशिक्षण केंद्र याचे उद्घाटन केर्ली गावचे लोकप्रिय महिला सरपंच सौ. नीलम माने व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. धीरज रूकडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धीरज रुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच करवीरचे व केर्लेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच केर्ली गावाचे प्रमुख नागरिक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्यात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे करवीर कार्याध्यक्ष रामचंद्र माने,केर्ले शाखेचे अध्यक्ष संदीप गायकवाड उपाध्यक्ष फिरोज नायकवाडे, केर्ले शाखेचे सदस्य…
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. सन 2026-27 या आर्थिक वर्षात शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या उदिदष्ट व तरतूदीच्या अधिन इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 1 जूनपर्यंत सादर करावेत. अर्जासोबत द्यावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गट हा पुरूष किंवा महिलांचा असावा. बचत गटांची नोंदणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती कृषी…
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : एमबीए/एमएमएस-सीईटी 2026 तसेच एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा शांततेत, सुव्यवस्थेत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पन्हाळा उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. पन्हाळा उपविभागातील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन, सोमवार पेठ, तीन दरवाज्याजवळ, पन्हाळा येथे 12 ते 20 मे या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. या कालावधीत परीक्षाकेंद्राच्या 100 मीटर परिसरात दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक साहित्य, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन व फॅक्स मशीन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्या दिवशी परीक्षा नाही त्या दिवशी हा…
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) मार्च परीक्षेचा निकाल 8 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जून-जुलै मध्ये घेण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी (फेबु. मार्च परीक्षेस प्रविष्ट न झालेले) व जून-जुलै परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन…
कोल्हापूर दिनांक 13 – वाडी रत्नागिरी (श्री क्षेत्र जोतिबा) येथे यात्राकर ठेक्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या संशयान्वये संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून रकमेची वसुली करण्याच्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जस्मिन यांना देण्यात आले. श्री क्षेत्र जोतिबा येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक भेट देत असतात.त्या अनुषंगाने मूलभूत सोयी सुविधा पुरविता याव्यात यासाठी ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी येथे दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने कोल्हापूर नाका व गिरोली नाका येथे यात्राकर गोळा करण्यासाठी ठेक्याची निविदा काढून ठेका दिला जातो.यामध्ये कोल्हापूर नाका येथे रु.1,50,00,000 व गिरोली नाका येथे रु.50,00,000 असे मिळून जवळपास रु. 2,00,00,000…
कोल्हापूर दि :- 07 -05 -2026 भारतीय संविधानाचे प्रतीक असलेल्या लोकशाहीला सुदृढ करणाऱ्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक पद्धतीमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय होण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनर्नरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचून काम करणारी यंत्रणा अधिक सक्षम पणे काम करण्यासाठी त्यांना विहित मुदत देऊन प्रभावीपणे अचूक नियोजन आपल्याकडून होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे प्राथमिक स्वरूपामध्ये निवेदन देण्यात आले. कोल्हापूर शहराची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथील मतदारसंघ हे खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहेत. या मतदारसंघांमध्ये आपल्याकडून एस.आय. आर ची प्रक्रिया राबवली जात आहे.सदरहू प्रक्रिया राबवली जात असताना नेमणूक केलेल्या बी.एल.ओ.ना त्यांच्या मुख्यालयातील सज्जावरील कामाचा…
कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र (योगासन), कोल्हापूर येथील खेळाडू रोहित चव्हाण याची ४ ते ८ जून २०२६ दरम्यान ट्रान्स स्टेडिया स्टेडियम, अहमदाबाद (गुजरात) येथे होणाऱ्या पहिल्या जागतिक योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. रोहितने यापूर्वी २९ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ दरम्यान संगमनेर येथे झालेल्या सहाव्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत वरिष्ठ गटातील सुपाईन प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची १ ते ३ मे २०२६ दरम्यान सोनीपत (हरियाणा) येथे झालेल्या निवड चाचणीसाठी निवड झाली होती. देशभरातील एशियन व राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंमधून त्याची अंतिम निवड जागतिक स्पर्धेसाठी करण्यात आली. रोहित हा कोल्हापूर…
कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, 7 मे रोजी सायं. 6 वाजता कागल येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शुक्रवार, 8 मे रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ- निवासस्थान कागल) सकाळी 10 वाजता जनता अर्बन को- सोसायटी, कागल येथील उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ- जयसिंगराव पार्क, कागल) सकाळी 10.30 वाजता जागतिक नर्सिंग दिनानिमित्त परिचारक व इतर सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- मटकरी हॉल, कागल) सकाळी 11.30 वाजता श्री दुर्गादेवी मंदिर, गडहिंग्लज वास्तूशांती व प्राणप्रतिष्ठापना व महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ-…